Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking ! अकाउंट बुकमध्ये गडबड; इंडसइंड बँकेत २००० कोटींचा घोटाळा

Big Breaking ! अकाउंट बुकमध्ये गडबड; इंडसइंड बँकेत २००० कोटींचा घोटाळा
 

इंडसइंड बँकेच्या अकाउंटिंग लॅप्सच्या प्रकरणी करण्यात येणाऱ्या चौकशीत नवीन खुलासे समोर आलेत. बँकेच्या तत्कालीन उच्च व्यवस्थापनाने त्यांच्या अकाउंटिंग बुकमध्ये फेरबदल केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात अंदाजे ₹२,००० कोटी रुपयांच्या अनियमितता झाल्याची बाब मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) केलेल्या प्राथमिक तपासात उघड झालीय. बँकेच्या तत्कालीन उच्च व्यवस्थापनाने त्यांच्या अकाउंटिंग बुकमध्ये फेरबदल केल्याचे मान्य केलंय.

गेल्या आठवड्यात ईओडब्ल्यूने बँकेचे माजी सीएफओ गोविंद जैन, माजी डेप्युटी सीईओ अरुण खुराणा आणि माजी सीईओ सुमंत कठपालिया यांचे जबाब नोंदवण्यात आले. नंतर खुराणा यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. या प्रकरणात खुराणा यांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण त्यांना बँकेच्या खात्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांची आणि समायोजनांची माहिती होती. नंतर खुराणा यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. 
तपासाशी परिचित असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे की खुराणा यांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण त्यांना बँकेच्या खात्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांची आणि समायोजनांची माहिती होती. या समायोजनांमुळे बँकेच्या शेअर्सची किंमत कृत्रिमरित्या वाढली, असा आरोप आहे. दरम्यान त्यावेळच्या काही उच्च व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी या माहितीचा फायदा घेऊन इनसाइडर ट्रेडिंग केली. ज्यामुळे यातून त्यांनी शेकडो कोटी रुपये कमावले अशी माहिती काही सुत्रांनी दिलीय. अनेक कर्मचारी आणि माजी अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर बँकेच्या पुस्तकांमध्ये दोन वेगवेगळ्या शीर्षकाखाली बदल करण्यात आले होते. यामुळे शेअरच्या किमतीवर परिणाम झाल्याचं ईओडब्ल्यूला आपल्या तपासात आढळून आले. दरम्यान काही माजी अधिकाऱ्यांचा दावा आहे की ते कोणत्याही अनियमिततेत सहभागी नव्हते.
पुढील पावले उचलण्याबाबत ईओडब्ल्यू लवकरच कायदेशीर अधिकारी आणि आर्थिक तज्ज्ञांकडून सल्ला घेईल. हे प्रकरण अनेक बाबतीत सत्यम घोटाळ्यासारखेच आहे, असं तपासात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. इंडसइंड बँकेला प्रथम त्यांच्या डेरिव्हेटिव्ह्ज पोर्टफोलिओमध्ये ही अकाउंटिंग लॅप्स आढळली. परंतु नंतर ती त्यांच्या मायक्रोफायनान्स व्यवसायात पसरली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, सीईओ सुमंत कठपालिया आणि डेप्युटी सीईओ अरुण खुराणा यांनी एप्रिल २०२५ मध्ये राजीनामा दिला होता.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.