Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आया-बहिणींनी पाठवलेली भाकरी चटणी आंदोलकांनी टाकली कचऱ्यात; मारला पंचपक्वान्नांवर ताव

आया-बहिणींनी पाठवलेली भाकरी चटणी आंदोलकांनी टाकली कचऱ्यात; मारला पंचपक्वान्नांवर ताव
 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून सुरु झालेल्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जेवणाची झालेली गैरसोय लक्षात घेता रविवारी आणि सोमवारी गावातून मोठ्याप्रमाणात विविध भागांतून आलेल्या भाकरी चटणी, पुरी भाजी आणि इतर खाद्यपदार्थांची पाकिटे अक्षरश: रस्त्यांवर आणि दुभाजकांवर फेकून दिल्याचे दिसून आले.
 
मराठा आंदोलकांचे खाण्या-पिण्याचे हाल झाल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी मुंबईतील विविध संघटनांनी जेवणाची आणि नाश्त्याची पाकिटे उपलब्ध दिली. त्यामुळे आंदोलकांना आया-बहिणींनी मेहनतीने बनवून गावातून पाठवलेली भाकरी चटणी ही मुंबईतील विविध संस्थांकडून पंचपक्वान्नांपुढे कडू लागल्याने या भाकऱ्याच फेकण्याची वेळे त्यांच्यावर आल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबईत शुक्रवारी मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलन कर्त्यांची खाण्यापिण्याची दुकाने बंद झाल्याने मोठी गैरसोय झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मराठवाडासह इतर भागांमधून मोठ्याप्रमाणात भाकरी चटणी आणि ठेचा हे कपड्यात बांधून गावागावांमधून पाठवण्यात आले होते. मुंबईत रविवारी आणि सोमवारी मोठ्याप्रमाणात आया-बहिणींनी मेहनत करून भाकऱ्या भाजून पाठवल्या, त्यांच्या मेहनतीला आंदोलकांनी कचऱ्याची जागा दाखवली. गावातील प्रत्येक घरातून या भाकऱ्या बनवताना महिलांनी भावी पिढीसाठी आंदोलन करणाऱ्यांची खाण्या पिण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आपुलकी आणि काळजीपोटी पाठवल्या होत्या. पण याच शेकडो आणि हजारो भाकऱ्या आंदालनकर्त्यांच्या पोटाची भूक भागवण्याऐवजी उकीरड्याची भर करण्यात गेल्या. 
 
आझाद मैदानाबाहेरील मेट्रो सिनेमा जंक्शन महापालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते जे जे पूल आणि विरुध्द दिशेला हुतात्मा चौकापर्यंत असलेले दुभाजक आणि पदपथांवर भाकऱ्या बांधून आलेल्या पोटल्या अक्षरश: फेकून दिल्याचे दिसून आले. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या महापालिका मार्गाचे दुभाजक या भाकऱ्या, पुरी भाजी, फळे, खाण्याची पाकिटे आणि पिण्याच्या भरलेल्या पाण्याच्या बॉटल्स फेकून दिल्याने हे चित्र पाहताना अनेकांचे जीव जळत होते. आंदोलकांना, ज्या मेहनतीने आणि आपुलकीने भाकऱ्यांसह इतर खाद्यपदार्थ पाठवले तेच कचऱ्यात फेकून दिल्याने खरोखरच आंदोलकांची खाण्याचे हाल होतात का असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. भाकऱ्या आणि चटणी पेक्षा मुंबईत हॉटेल्समधील पंचपक्वान्न आणि चिवडा फरसाण गोड वाटू लागल्याने प्रेमाने बनवून पाठवलेल्या भाकरी चटणी आंदोलकांना कडू वाटू लागली का असाही प्रश्न हे दृश्य पाहताना प्रत्येकाच्या मनात निर्माण होत होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.