बेडरूमला लावली कडी, चोरट्यांनी लुटली तिजोरी; सांगलीत जबरी जोरीने खळबळ
विजयनगर-वानलेसवाडी येथील खताळनगरमधील प्रा. अशोक कांबळे यांच्या बंगल्यात मध्यरात्री चोरट्यांनी घुसून कुटुंबीयांना बेडरूममध्ये बाहेरून कडी लावली व दुसऱ्या बेडरूममधील तिजोरी फोडली.
चोरट्यांनी १३ तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी व २ लाख रुपये रोकड असा सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास केला.
संजयनगर पोलिसांनी ठसे तज्ज्ञ, श्वानपथकासह घटनास्थळी पाहणी केली असून पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.
बंगल्यात कुटुंब झोपले होते. मध्यरात्री चोरटे आले. हॉलच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यावेळी बेडरूममध्ये झोपलेल्यांना बाहेरून कडी लावली. त्यानंतर दुसऱ्या बेडरूमधील तिजोरीवर चोरट्यांनी हात साफ केला. विजयनगर येथील खताळनगरमध्ये घडली. चोरट्यांनी तब्बल तेरा तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी आणि दोन लाखांची रोकड असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी प्रा. अशोक विष्णू कांबळे यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रा. कांबळे यांचा विजयनगर-वानलेसवाडी येथील खताळनगरमध्ये पुष्पाराणी हा बंगला आहे. गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास कुटुंबिय झोपी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंगल्यासमोर प्रवेश केला. हॉलच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. कांबळे कुटुंब ज्या बेडरूममध्ये झोपले होते, त्या बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. त्यानंतर दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश करून तेथील तिजोरी उघडली.
आतील लॉकर तोडून त्यातील सोन्याचे मंगळसुत्र, अंगठी, कानातील झुमके, टॉप्स, तोडे, रिंगा, नथ असे १३ तोळे २ ग्रॅम सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने, रोख २ लाख रूपये असा सुमारे दहा लाखांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पलायन केले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कांबळे यांना जाग आली. तेव्हा त्यांना बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले.
दरम्यान, संजयनगर पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी खताळनगर येथे येऊन बंगल्याची पाहणी केली. बंगल्यात कुटुंबिय असताना चोरट्यांनी धाडसाने चोरी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होते. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.