Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमचा स्टेटस कोण रिशेअर करणार हे फक्त तुम्हीच ठरवायचं! व्हॉट्सअ‍ॅपने आणलं गेमचेंजर फीचर, कसं वापरायचं? पाहा

तुमचा स्टेटस कोण रिशेअर करणार हे फक्त तुम्हीच ठरवायचं! व्हॉट्सअ‍ॅपने आणलं गेमचेंजर फीचर, कसं वापरायचं? पाहा

आपलं लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन आणि आकर्षक फीचर घेऊन येत आहे. या फीचरद्वारे युजर्स आता त्यांचे स्टेटस अपडेट्स कोण शेअर करू शकेल, यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतील.

सध्या हे फीचर अँड्रॉइड बीटा (v2.25.27.5) मध्ये उपलब्ध आहे आणि लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआउट होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना त्यांचे स्टेटस शेअरिंगचे अधिकार मर्यादित करता येतील. नवीन 'अलाऊ शेअरिंग' टॉगलद्वारे युजर्स ठरवू शकतील की त्यांचे स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्स, निवडक व्यक्ती किंवा विशिष्ट ग्रुपसोबत शेअर होऊ शकेल. विशेष म्हणजे हे फीचर डिफॉल्टनुसार बंद असते ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी कायम राहते. युजर्सना ते स्वत: सक्रिय करावे लागेल.

कसं काम करेल हे फीचर?

हे फीचर युजर्सना स्टेटस शेअरिंगवर नियंत्रण देईल. युजर्स स्टेटस शेअरिंगची परवानगी देऊ शकतील किंवा बंद करू शकतील. शेअर केलेल्या स्टेटसवर मूळ पोस्ट कोणाची आहे, हे दाखवणारा लेबल दिसेल परंतु मूळ युजरचं नाव किंवा नंबर गोपनीय राहील. याशिवाय स्टेटस शेअर केल्यास मूळ युजरला त्याची सूचना मिळेल ज्यामुळे पारदर्शकता वाढेल.

प्रायव्हसीला प्राधान्य

व्हॉट्सअॅप सातत्याने युजर्सच्या प्रायव्हसीसाठी नवीन सुविधा आणत आहे. हे फीचर अनावश्यक शेअरिंग टाळण्यास आणि युजर्सचा त्यांच्या कंटेंटवरील मालकी हक्क राखण्यास मदत करेल. भारतात जिथे व्हॉट्सअॅपचे अब्जावधी युजर्स आहेत अपडेट्सच्या वेळी हे फीचर विशेष उपयुक्त ठरेल.

सध्या हे फीचर बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. येत्या काही आठवड्यांत व्हॉट्सअॅप हे फीचर जागतिक स्तरावर रोलआउट करेल. या नव्या सुविधेमुळे व्हॉट्सअॅप युजर्सना अधिक सुरक्षित आणि नियंत्रित अनुभव मिळेल यात शंका नाही

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.