Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ

"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
 

नवी दिल्ली : माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो. त्यासाठी तुला एक रुपयादेखील खर्च लागणार नाही, असे म्हणत येथील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी असे बाबाचे नाव आहे. १७ विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर चैतन्यानंदविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, त्यापूर्वीच चैतन्यानंद फरार झाला.

चैतन्यानंदच्या परिसरात पोलिसांचे छापे

पोलिसांनी इन्स्टिट्यूटमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर चैतन्यानंदशी संबंधित सात ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट परिसरातून एक व्होल्वो कार जप्त केली. चैतन्यानंद वापरत असलेल्या या कारचा नंबरदेखील बनावट असल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले.
 
काय आहे प्रकरण?
चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी या व्यक्तीवर गंभीर आरोप समोर आले आहेत. दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट या संस्थेतील १७ मुलींनी या बाबाविरोधात लैंगिक छळाची तक्रार दिली आहे. मुलींना अश्लील मेसेज पाठवणे, त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधणे असे आरोप त्याच्यावर आहेत. हा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याआधीही चैतन्यानंद याच्यावर असे आरोप झाले होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.