Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरी

सांगली :- अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरी
 

विटा : खानापूर तालुक्यातील वेजगाव येथील अल्पवयीन मुलीवर २०१८ साली झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तब्बल सात वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी संतोष ऊर्फ राजेंद्र माणिक पाटोळे (वय २९, रा.वेजगाव) याला एकूण सात वर्षांची सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजता पीडित अल्पवयीन मुलगी गावातील भिकवडी रस्त्यावरील ओढा पुलाजवळून जात असताना, आरोपीने तिचा विनयभंग करून तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर भीतीने घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर रात्री सव्वा बारा वाजता विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यावेळी विटा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे (सध्या उमरगा, जि. धाराशिव) यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली होती.याप्रकरणी सबळ पुरावे गोळा करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. २९ सप्टेंबर २०२५ रोजी विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी निकाल देत आरोपीस POCSO कायदा कलम 8 अंतर्गत - 4 वर्षांची सक्त मजुरी व ₹20,000 दंड (दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद) तसेच IPC कलम 354 अंतर्गत - 3 वर्षांची सक्त मजुरी व ₹10,000 दंड (दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद) शिक्षा सुनावली. 
 
या प्रकरणात पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शी, पंच व अन्य मिळून एकूण ८ साक्षीदारांची साक्ष निर्णायक ठरली. या लढ्यात पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक डी. वाय. फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सरकारी वकील अर्थी देशपांडे-साटविलकर, पोलीस कर्मचारी सचिन खाडे, भाग्यश्री नांगरे, नीलम जगदाळे या अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.