Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-पलूसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चौघांना अटक

सांगली :-पलूसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चौघांना अटक

पलूस : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बालविवाह तसेच जातीवाचक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. याबाबत पीडितेने पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित राजू सुरेश लोहार, माधुरी सुरेश लोहार, गणेश सुरेश लोहार (सर्व रा.किर्लोस्करवाडी, ता. पलूस) व शैला (पूर्ण नाव माहीत नाही) (रा. निढळ, जि. सातारा) यांनी 10 ऑक्टोबर 2024 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान संगनमत करून पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फसवले.

संशयित राजू लोहार याने स्वतः विषारी मुंग्याची पावडर खाल्ली असल्याचे खोटे सांगून फिर्यादीस बोलावून घेतले. अल्पवयीन असल्याचे माहीत असूनसुद्धा तिच्याशी जबरदस्ती विवाह लावून दिला. त्यानंतर राजू लोहार याने किर्लोस्करवाडी व इचलकरंजी येथे वारंवार शारीरिक संबंध ठेवले. आरोपी राजू, माधुरी, गणेश व शैला या चौघांनी तू खालच्या जातीची आहेस, आमच्या जातीत बसत नाहीस, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.