KBC 17 सध्या फार चर्चेत आहे. तसेच यावेळी स्पर्धकांचीही तेवढीच चर्चा होताना दिसत आहे. असाच हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या स्पर्धकाने ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यावरून त्याने अमिताभ बच्चन यांचं भविष्य सांगितलं, जे जाणून बिग बी देखील थक्क झाले. चॅनलने कोन बनेगा करोडपती 17 च्या या भागांचा रंजक प्रोमो पोस्ट केला आहे. एका प्रोमोमध्ये, अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेला आदित्य नावाचा स्पर्धक ज्योतिषशास्त्राचा विद्यार्थी असल्याचे दिसत आहे. तर या स्पर्धकाने बिग बींचे काय भविष्य सांगितले आहे चला जाणून घेऊयात.
पदव्यांनी प्रभावित झाले अमिताभ बच्चन
हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाशी गप्पा मारताना बिग बी नेहमीच त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा आवडी-निवडीबद्दल बोलत असतात. तसेच प्रश्न त्यांनी आदित्यलाही विचारले. आदित्यच्या शिक्षणाने अमिताभ बच्चन प्रभावित झाले. तेव्हा त्यांनी म्हटलं की, 'सर, जर तुमचे इतके शिक्षण झाले आहे तर तुम्ही इथे काय करत आहात?' बिग बी आदित्यच्या पदव्या मोजत असताना,आदित्यने त्यांना वैदिक ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केल्याचं उघड केलं. ज्योतिष ऐकताच अमिताभ बच्चन हसले आणि म्हणाले की, ' मग तुम्ही देशात काय चाललं आहे ते सांगू शकाल का? तसेच सर, भविष्यात आम्ही चांगले काम करू का? कसे असतील आमचे येणारे दिवस, आमच्याबद्दल काही सांगाल का? असे प्रश्न विचारले.
बिग बींचे भविष्य सांगितले
बिग बींच्या प्रश्नांचं उत्तर देत असताना आदित्यने सांगितले " सर खूप छान होणार आहे तुमचं" हे ऐकताच अमिताभ बच्चन विचारतात की "तुम्हाला कसे कळते की आमच्यासाठी सर्व काही ठीक असणार आहे?" तेव्हा आदित्य म्हणतो, 'सर, जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा आम्हाला काही नमुना चार्ट मिळतात जे आम्ही अभ्यासतो.' अमिताभ बच्चन विचारतात, 'कोणता चार्ट', आदित्य उत्तर देतो, 'जन्म कुंडली.'; अमिताभ बच्चन आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, "तुम्हाला आमची जन्म कुंडली कशी मिळाली?" ,जेव्हा आदित्य अमिताभ यांना सांगतो की त्यांची जन्मकुंडली त्याला इंटरनेटवर उपलब्ध असल्याने मिळाली. तेव्हा अमिताभ बच्चन यांना फार आश्चर्य वाटले. त्यांच्यासाठी ही माहिती खरोखरंच अचंबित करणारी होती.
अमिताभ बच्चन यांच्या ड्रेसिंग सेन्सचा चाहता
दुसऱ्या एका प्रोमोमध्ये, आदित्य अमिताभ बच्चनला सांगताना दिसतो की तो त्याच्या ड्रेसिंग सेन्सचा खूप मोठा चाहता आहे. त्याने अनेक ठिकाणी बिग बींची कॉपी केली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारखे कपडे घालताना त्याचे फोटो देखील नंतर शोमध्ये दाखवले जातात. ते पाहून बिग बी म्हणतात की फक्त चष्मा वेगळा आहे. तसेच ते त्याला हेही सांगतात की, त्यांना जे कपडे मिळतात ते त्यांचे स्वतःचे नाहीत पण ते सरकारकडून म्हणजेच प्रॉडक्शन हाऊसकडून त्यांना मिळतात. सध्या हा व्हिडीओ चंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.