सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतर देखील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून नेत्यांना मदत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कीट घेऊन गेलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोन करत मदतीविषयी विचारणा केली.
ज्योती वाघमारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना म्हणाल्या की, अन्नाचे पाकीट मिळाले पाहिजे.त्यावर आशीर्वाद यांनी सरकारकडून अन्नधान्याची मदत केली जात असल्याची माहिती दिली. मात्र, अन्नाची पाकीटे मिळाली पाहिजे असे वाघमारे वारंवार सांगत होत्या. तसेच आपण देखील येथे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी म्हटले.त्यावर तुम्ही देखील मदत करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचवले असता आपण मदत करण्यासाठीच आलो असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिप्रश्न करत मदतीचे किती कीट आणले, अशी विचारणा केली. त्यावेळी जेवणाची नाही, अन्नधान्याची कीट घेऊन आलो असल्याचे त्यांनी म्हटले. पण नेमके किती कीट आणले, असा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिप्रश्न केला असता आम्ही 200 कीट आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन हजार लोक आहेत तुम्ही 200 लोकांचं कीट आणलंय, कशी मदत होईल हे मला सांगा? असे म्हणत वाघमारेंना झापले.
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार
जिल्हाधिकारी
कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, शेल्टर होममध्ये मदत करतो आहोत.
प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू देत आहोत. दोन तीन
दिवसांमध्ये खात्यावर पाच हजार रुपये जमा केले जातील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.