गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांसंदर्भात बोलताना जीभ घसरली. दरम्यान यानंतर पवारांची राष्ट्रवादी देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन करण्यात आली. तर संजय राऊतांनी देखील पडळकरांच्या वक्तव्यानंतर एक गौप्यस्फोट केला आहे. तेव्हा संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय पाहुयात. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. जयंत पाटील भाजपात जाण्यास नकार देत असल्यामुळे पडळकरांनी त्यांचा बाप काढल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांनी केलेल्या या विधानानंतर भाजपनं देखील राऊतांवर पलटवार केला आहे.
जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवर सत्ताधा-यांनी देखील खंत व्यक्त केलीये. मोठ्या नेत्यांवर बोलतांना सांभाळून बोलायला हवं असा सल्ला गुलाबराव पाटलांनी दिलाय. तर अमोल कोल्हे यांनी शायरीच्या माध्यमातून पडळकर आणि सरकारवर ताशेरे ओढले आहेत.. गोपीचंद पडळकरांवविरोधात राज्यभर पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येतंय. पडळकरांनी जयंत पाटलांचा बाप काढल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. इस्लामपुरात पडळकरांविरोधात केलेल्या आंदोलनात बापू बिरू वाटेगावकरांचा मुलगा शिवाजी वाटेगावकरांनी पडळकरांचा चांगलाच समाचार घेतलाय. गोपीचंद पडळकरांवर त्यांनी सडकून टीका केलीय.पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पडळकर यांचे कान टोचले आहेत. मात्र, याआधी देखील पडळकरांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तेव्हाही अशा प्रकारे त्यांना समज देण्यात आली होती. मात्र, तरीही त्यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यानं चांगलंच राजकारण तापलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.