नागपूर : वयाच्या साठीनंतर पुरुषांना होणारा आजार म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. पुरुषांत प्रोस्टेट ग्रंथी आकाराने वाढू लागते. त्यामुळे लघवी थांबून थांबून होते. वेदना होतात. रात्री त्रास वाढत जातो. लघवी झाल्यानंतरही समाधान होत नाही. ओटीपोटीत दुखणे किंवा फुगणे अशी लक्षणे आढळतात. साधारणत: सहापैकी एका वृद्ध पुरुषाला प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर असल्याचे दिसून येत असल्याचे, निरीक्षण 'प्रोस्टेट ग्रंथी कॅन्सर' जागृती अभियान दरम्यान नोंदविण्यात आले. सप्टेंबर महिना जगभरात प्रोस्टेट कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. प्रोस्टेट ही एक छोटी ग्रंथी आहे, अक्रोडा एवढ्या आकाराची असते. मूत्राशयाखाली आणि मलाशयासमोर असते. किडनीतून शुद्धीकरण झाल्यानंतर अनावश्यक घटक मूत्राद्वारे बाहेर टाकण्यासाठी पुरुषांत एक नळी कार्यरत असते.
या नळीभोवती प्रोस्टेट ग्रंथी असतात. याचे मुख्य काम म्हणजे शुक्राणूंना पोषण आणि संरक्षण देणारे द्रव तयार करणे. प्रोस्टेटमधील पेशी अनियमितरीत्या वाढू लागतात, ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर होतो. प्रोस्टेट कॅन्सरला सहज प्रतिबंध करता येतो, मात्र या आजाराचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे युरोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत जय म्हणाले.
याकडे लक्ष द्या...
भरपूर पाणी व भरपूरव्यायाम करावामद्य व कॅफेनचे सेवन टाळादररोज समतोल आहार घ्या.लघवीतून रक्त येणेपाठ, कंबर, ओटीपोटात सतत वेदना होणेरात्रीच्या वेळी वारंवार लघवी लागणेलघवी करताना ताकद लागणेपन्नास वर्षांवरील पुरुषांसाठी ही तपासणी विशेषतः महत्त्वाची आहे. ज्यांच्या कुटुंबात या आजाराचा इतिहास असेल, अशा पुरुषांनी ४५ वर्षांपासून तपासणी करून घ्यावी. हा आजार झाल्यास दुर्बिणीद्वारे निरीक्षण करून लघवीच्या मार्गातील अडथळे दूर करणे सहज शक्य आहे. याशिवाय रेडिएशन थेरपी तसेच गुंतागुंत झाल्यानंतरही शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य आहे.-डॉ. श्रीकांत जय, युरोलॉजिस्ट (प्रोटेस्ट ग्रंथी उपचारतज्ज्ञ), नागपूर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.