Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली हदरली झोपेत असताना चाकूने सपासप वार, नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं


सांगली हदरली! झोपेत असताना चाकूने सपासप वार, नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं

सांगलीमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. सांगली शहरातील शांतीनगर येथे ही घटना घडली. नवऱ्या बायकोवर धारदार शस्त्राने वार करत तिला जागीच संपवलं. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. कोमल प्रशांत एडके असं मृत विवाहितेचे नाव आहे. कोमल झोपेत असताना तिच्या नवऱ्याने तिच्यावर वार करत हत्या केली. बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून कोमल आणि तिचा नवरा यांच्यामध्ये वाद सुरू होते. अनेकदा हे वाद पोलिस ठाण्यापर्यंत देखील पोहोचले होते. पोलिसांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा वाद काही मिटला नाही. कोमल तिच्या माहेरी मलकापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास होती. शनिवारी प्रशांतने काजलची समजूत काढून तिला मलकापूरवरून घरी घेऊन आला होता.

सकाळच्या वेळेस कोमल झोपेत असतानाच त्याने धारदार शस्त्राने वार करीत तिची हत्या केली. कोमलची हत्या केल्यानंतर प्रशांतने घराला बाहेरून कडी लावत थेट सांगली शहर पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून काजलचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येची बातमी वाऱ्यासारखी शांतीनगर परिसरामध्ये पसरली आणि बघायची एकच गर्दी झाली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.