Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तिरुपती मंदिरात १०० कोटींच्या चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा, CCTV फुटेजमध्ये चोरी करताना दिसला अधिकारी

तिरुपती मंदिरात १०० कोटींच्या चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा, CCTV फुटेजमध्ये चोरी करताना दिसला अधिकारी
 

आंध्रप्रदेशच्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) येथील कोट्यवधी रुपयांच्या चोरीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्यामध्ये वायएसआरसीपीची सत्ता असताना तिरुमला स्वामींच्या परकामणीतून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम चोरीला गेली होती, असा आरोप टीटीडी बोर्डाचे सदस्य भानु प्रकाश रेड्डी यांनी केला आहे.

मिळाल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानम हे देशातील सर्वात लोकप्रिय देवस्थानांपैकी एक आहे. या मंदिरामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम चोरी झाल्याचे देवस्थानाच्या बोर्डाचे सदस्य भानु प्रकाश रेड्डी यांनी केला आहे. त्यांनी या घोटाळ्याचे वर्णन टीटीडीच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी असे केले आहे. या संदर्भामध्ये भानु प्रकाश रेड्डी यांनी सीसीटीव्ही फुटेज देखील जारी केले आहे. भानु प्रकाश रेड्डी यांनी सादर केलेल्या व्हिडीओमध्ये रवी कुमार नावाचा एक व्यक्ती परकामणीतून चोरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 
 
त्याने हे पैसे रिअर इस्टेटमध्ये गुंतवले होते, घोटाळ्यानंतर महत्त्वाचे पुरावे नष्ट केले असा आरोप भानु प्रकाश रेड्डी यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. घोटाळ्यामध्ये वायएसआरसीपीचे अनेक नेते, वरिष्ठ अधिकारी आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचा आरोप भानु प्रकाश रेड्डी यांनी केला आहे. चोरीच्या पैशांमधील एक भाग ताडेपल्ली येथील राजवाड्यात नेण्यात आला होता. उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले असून एका महिन्याच्या आत सीलबंद अहवाल मागितला आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.