निवडणूक आयोगाकडून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनेक बदल केले जात आहेत. आताच्या काळात आयोग जनता आणि राजकारण्यांचे हित लक्षात घेऊन अनेक निर्णय घेत आहे. बिहार विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये येत आहेत, त्याआधी मोठे बदल केली जात आहेत. गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने ३० मोठे बदल केलेत. यातील यादीबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय.
पोस्टल मतपत्रिका मोजल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार नाही. मतमोजणी प्रक्रिया सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलण्यात आलंय. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ईव्हीएम आता उघडता येणार नाहीत. असा आदेश निवडणूक आयोगाने आपल्या नव्या नियमातून दिलाय. आतापर्यंत पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली नसली तरी EVM उघडून त्याच्या मोजणीला सकाळी ८:३० वाजता सुरूवात केली जात असत.पण आता यातपूर्णपणे बदल करण्यात येणार आहे. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच EVM उघडल्या जाणार आहेत. जर एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जास्त पोस्टल मतपत्रिका असतील तर त्यांच्यासाठी अधिक टेबले लावली जातील. जर काही समस्या उद्भवल्या तर त्याची जबाबदारी तिथे उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांची असे, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जर अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर ते केले जाईल, जेणेकरून निकाल देण्यात उशीर होणार नाही. आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. निकाल प्राप्त झाल्यानंतर, ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होणार आहे.
पोस्टल बॅलेटद्वारे कोण मतदान करते?
मतदानाविषयी जनजागृती वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटद सुरू केल्या. नोकरीमुळे जे मतदार स्वतःच्या मतदारसंघात मतदान करू न शकत नाहीत ते या द्वारे मतदान करतात. यासह ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, अपंग मतदार पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतात. परंतु यासाठी आधी नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यांचे मतदान सर्वसामान्यांच्या मतदानाच्या काही दिवस आधी पूर्ण होते. जेव्हा जेव्हा निवडणुकीमध्ये मतमोजणी सुरू होते तेव्हा प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातात. त्यानंतर, ईव्हीएममध्ये नोंदवलेली मते मोजली जातात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.