मध्य प्रदेशात खंडवा जिल्ह्यातील पांढाणा येथे दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणारा ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अर्दला धरणात उलटला. या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ मुले आहेत, तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले.
गुरुवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला.
दुर्घटना घडली त्यावेळी ट्रॉलीमध्ये एकूण २६ भाविक मूर्तीसोबत बसले होते. ते नऊ दिवसांपासून त्यांच्या घरी असलेल्या देवीच्या मूर्तीचे विसर्जनास गेले होते. अपघातानंतर दोन तासांनी जिल्हा प्रशासन, होमगार्ड आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, जामली गावाजवळील राजगड पंचायतीतील पडल फाटा फलिया येथून लोक ट्रॅक्टर-ट्रॉलीने विसर्जनासाठी अर्दला धरणाकडे जात होते. एका पोलिस निरीक्षकाने ट्रॅक्टरला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येत असताना थांबवले, परंतु चालकाने नकार दिला पाण्यात २० ते २५ मीटर गेल्यानंतर, ट्रॉली एका बुडालेल्या कल्व्हर्टजवळ उलटली. ११ जण बुडाले. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.