साईबाबांच्या पवित्र धामात भ्रष्टाचाराचा भूकंप आला आहे. हा साधा सुधा भूकंप नाहीये..तर खूप मोठा घोटाळा आहे. शिर्डी साई संस्थानच्या विद्युत विभागात ७७ लाख रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याच्या प्रकरणी तब्बल ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शिर्डीत खळबळ
उडाली असून भक्तांमध्ये राग आणि आश्चर्य पसरले आहे. सामाजिक कार्यकर्ते
संजय काळे यांच्या धैर्यवान लढ्यामुळे हे काळे कृत्य उघड झाले आहे. चला,
जाणून घेऊया या प्रकरणाचा थरारक किस्सा
२०२२ मध्ये संजय काळे यांनी संस्थानच्या विद्युत विभागात लाखो रुपयांचे वायर, ट्रान्सफॉर्मर, बल्ब आणि इतर महत्त्वाचे साहित्य गायब झाल्याची तक्रार केली. त्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने धाडसाने आदेश दिला की 'तात्काळ चौकशी करा आणि गुन्हा दाखल करा!' पोलिसांनी तातडीने धुरळा उडवला. प्राथमिक तपासात धक्कादायक सत्य समोर आले
विभाग प्रमुख, अभियंते, सहाय्यक कर्मचारी असे एकूण ४७ जणांनी मिळून हे साहित्य चोरले आणि विकले असल्याची खात्री पटली. शिर्डी पोलिस ठाण्यात रविवारी हा गुन्हा दाखल झाला. सीसीटीव्ही फुटेज, बिलांची तपासणी आणि साक्षीदारांच्या जबानींमुळे चोरीची रक्कम नेमकी ७७ लाख इतकीच.. "हे साहित्य मंदिराच्या दिव्य प्रकाशासाठी होते, पण ते हाताळणाऱ्यांनीच अंधार केला," असे काळे यांनी भावूक होऊन सांगितले.या प्रकरणामुळे संस्थान प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रमुख अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू असून आणखी काही उघड होण्याची शक्यता आहे.भक्त म्हणतात, "साईबाबा सर्वकाही पाहत असतील.. हे भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आम्ही उभे आहोत." पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच या लोकांना अटक होणार असून संपूर्ण तपशील जाहीर होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.