एकाच वेळी 83 मुलांना जन्म देणार जगातील पहिली AI मंत्री! प्रेग्नसीची घोषणा करताना PM एडी रामा म्हणाले, 'आम्ही धोका..'
जगातील पहिल्या एआय मंत्री डिएला ही सध्या अल्बेनियाच्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील सक्रीय सहकारी आहे. अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात एआय मंत्री डिएलाची नियुक्ती केल्याची बातमी साऱ्या जगभरात चर्चेचा विषय ठरली. आता, याच एआय मंत्र्यासंदर्भातील थक्क
करणारी बातमी समोर आली आहे. अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी जाहीर केले आहे की
ही एआय मंत्री डिएला आता गर्भवती आहे. नजीकच्या भविष्यात डिएला 83 मुलांना
जन्म देणार आहे. डिएलाला मंत्रिमंडळात नियुक्त केल्यावर ती जागतिक स्तरावर
चर्चेचा विषय ठरली होती आणि आता तिच्या गरोदरपणाच्या बातमीने ती पुन्हा
एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.
एआय मंत्री गरोदर कशी राहिली?
मीडिया
रिपोर्ट्सनुसार, डिएला 83 मुलांना जन्म देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
लवकरच ती 83 मुलांची आई होणार आहे. ही बातमी ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित
झाला आहे. एआयने तयार केलेली मंत्री गर्भवती कशी होऊ शकते? तेही एकाच वेळी
ती 83 मुलांना जन्म कसा देणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
या बातमीमागील सत्य काय आहे?
एआय मंत्री गर्भवती कशी होऊ शकते? आणि ती एकाच वेळी 83 मुलांना कशी जन्म देऊ शकते? या बातमीमागील सत्य तपासून पाहिले असता हे, प्रकरण वेगळेच निघाले. खरं तर, अल्बेनियन सरकार त्यांच्या प्रत्येक खासदारासाठी एआय सहाय्यक तयार करण्याचा विचार करत आहे. पंतप्रधान एडी रामा यांनी ही बातमी अगदीच विनोदी पद्धतीने जाहीर केली. या 83 एआय सहाय्यकांचा उल्लेख पंतप्रधानांनी एआय डिएला गरोदर असून ती 83 मुलांना जन्म देणारे आहे असं म्हणत केला. जर्मनीमधील बर्लिनमध्ये आयोजित संवादादरम्यान एडी रामा यांनी हे विधान केले. अल्बेनियन पंतप्रधानांनी, "आम्ही डिएलासंदर्भात मोठा धोका पत्करला आणि यशस्वी झालो. डिएल गर्भवती आहे आणि 83 मुलांना जन्म देणार आहे."
डिएलाची मुलं संसदीय कामकाज पाहतील
पंतप्रधान एडी रामा म्हणाले, "डिएलाची भावी मुले किंवा सहाय्यक, अल्बेनियन संसदेत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतील. खासदारांकडून चुकलेल्या घटना आणि संभाषणांची माहिती हे सहाय्यक शेअर करतील. डिएलाचं प्रत्येक मुलं त्यांच्या संबंधित खासदारांना सहाय्यक म्हणून काम करतील. ते त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या खासदारांना सल्ला देखील देतील." सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सहाय्यकांना त्यांच्या आई डाएलाबद्दल देखील संपूर्ण माहिती असेल, असं सांगण्यात आलं आहे.
डाएलाची मुले काय काम करणार?
अल्बेनियन पंतप्रधानांच्या मते, ही नवीन प्रणाली त्यांच्या संसदेत लवकरच लागू केली जाईल. 2026 पर्यंत त्यांच्या संसदेत ही संपूर्ण व्यवस्था लागू करण्याची त्यांची योजना आहे. पंतप्रधान एडी रामा यांनी एक उदाहरण दिले: "समजा, संसदीय अधिवेशनादरम्यान, एखादा खासदार चहा पिण्यासाठी बाहेर गेला आणि परतण्यास उशीर झाला किंवा काही कामात अडकला, तर डाएलाची मुले त्याला कामावर परण्याची आठवण करून देतील आणि त्याला त्याच्या कामावर परत आणण्यास सहाय्य करतील. या काळात, डाएलाची मुले विरोधी नेत्यांवर प्रत्युत्तर देण्यासाठी मुद्दे देखील मांडतील." पंतप्रधानांनी असेही सांगितले की पुढच्या वेळी ते भेट देतील तेव्हा त्यांच्यासोबत या 83 सहाय्यकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्क्रीन असतील. अल्बेनियन पंतप्रधानांनी स्पष्ट केले की ते ही व्यवस्था पूर्णपणे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी अंमलात आणण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.