राज्यातील एका सरकारी अधिकाऱ्यांच्या बायकोची महिन्याची कमाई ऐकून
थक्क व्हाल, महिन्याला तब्बल 85 लाखांची कमाई करून ईडीलाही चकित केलं!
राज्यातील एका सरकारी अधिकाऱ्यांच्या बायकोच्या महिन्याची कमाई ऐकून थक्क व्हाल. थोडी तिकड़ी नाही तर महिन्याला 85 लाख रुपये ही सरकारी अधिकाऱ्याची बायको कमवते.आम्ही ज्या अधिकाऱ्याबद्दल बोलतोय, त्या अधिकाऱ्याचं नाव आहे अनिल कुमार पवार. माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना
सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने अटक बेकायदेशीर असल्याचं
सांगितलं असलं तरी, त्यांच्या बायकोची महिन्याची कमाई सध्या चर्चेचा विषय
बनलेली आहे.
ED च्या चौकशीत उलगडले महिन्याच्या कमाईचं गणित
फोटोत दिसणाऱ्या आहेत भारती अनिलकुमार पवार, म्हणजे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची पत्नी. मागील दोन महिन्यांपासून अनिल कुमार पवार यांची रवानगी ईडीच्या तुरुंगात होती. अनिल कुमार पवार यांच्यासह त्यांची पत्नी भारती पवार यांच्यावर मनी लॅंडिंगचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु भारती पवार यांना अटक करण्यात आली नव्हती. 13 ऑगस्ट रोजी अनिल कुमार पवार यांना अटक करण्यात आली होती.
अनिल कुमार पवार यांना दोन दिवसांपूर्वी हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलासा देत ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. परंतु ज्या वेळेला अनिल कुमार पवार यांना अटक झाली, त्याच वेळेला भारती पवार यांची देखील ED कडून स्टेटमेंट रेकॉर्ड केली गेली. भारती पवार यांना जवळपास पाच वेळा बोलावून चौकशी करण्यात आली आहे. आणि त्या चौकशीत त्यांनी महिन्याच्या कमाईचं गणित मांडलं आहे.
भारती पवार यांनी दिलेल्या महिन्याच्या कमाईचे तपशील
भारती पवार यांनी आपल्या मासिक पगाराची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे:
-BSR Realty - ₹20-25 लाख प्रतिमहिना-Janardan Agro Services - ₹20-25 लाख प्रतिमहिना-Shrutika Enterprises - ₹30-35 लाख प्रतिमहिना-कृषी उत्पन्न - ₹50-60 लाख वार्षिकयाची बेरीज केली तर वर्षाकाठी 10 कोटी 80 लाख रुपये तर महिन्याला 85 ते 90 लाख रुपये मिळतात. ही सर्व कमाई डोळे दीपवणारी आहे.
कंपन्यांतील हिस्सेदारी आणि गुंतवणूक
एक्झिबिट क्रमांक 65 अंतर्गत नोंदवलेल्या तिच्या जबाबात, पवार यांनी स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या मालकीच्या संस्थांची सविस्तर माहिती दिली आहे.
-जनार्दन अॅग्रो सर्व्हिसेस लिमिटेड: भारती पवार 90% आणि भाऊ मिलिंद पगार 10% हिस्सेदार; या फर्ममध्ये ₹20 लाखांची गुंतवणूक; दरवर्षी ₹25-30 लाख उत्पन्न.
-BSR Realty: पवार 90% आणि आई कुमुदिनी पगार 10% हिस्सा; जनार्दन पवार ₹50,000 पगारावर काम करतात.
-श्रुतिका एंटरप्रायझेस: तीन भागीदार असून सर्वांची नावे आठवत नसल्याचं नमूद.
-ट्रायक्वेट्रा कॉन्स्ट्रोटेक एलएलपी आणि अनमोल बिल्डकॉन: पवार आणि कुटुंबीयांच्या नावाने स्थापन, अद्याप काम सुरू नाही.-विठाई वीव्ह्ज प्रायव्हेट लिमिटेड (जळगाव): कैलाश पाटील 79%, प्रविण पाटील 10%, भारतीची कन्या श्रुतिका 11%.मुलींचं शिक्षण आणि आर्थिक व्यवहार-श्रुतिकाच्या एमडी अभ्यासक्रमासाठी ₹27 लाख, रेवतीच्या फॅशन डिझायनिंगसाठी ₹24-25 लाख फी.-संजीवनी डेव्हलपर्स (पुणे) कडून ₹30 लाख व्याजमुक्त कर्ज घेतले, ₹27 लाख परतफेड केली.-सुसगाव (पुणे) येथील ऑर्किड हाऊसिंग सोसायटीतील दोन फ्लॅट खरेदी व विक्री, जीएसटी डेव्हलपरकडे जमा.-कोथरूड येथील कुशिका संजीवनी डेव्हलपर्सच्या प्रकल्पासाठी ₹3,09,800 गुंतवणूक.-SAP Ventures मध्ये ₹43.21 लाखांचा धनादेश 'न्यू फ्रंट रिअल्टी' प्रकल्पासाठी गुंतवणूक.चौकशीत भारती पवार यांनी कबूल केले की, तपासापूर्वी त्यांनी 2-3 दिवसांत मोबाईलवरील WhatsApp चॅट्स आणि फोटो डिलीट केले. तसेच अनेक संस्थांच्या बँक खात्यांवरील रिकामे चेक्स आपल्या भावाला दिले असल्याचंही मान्य केलं. पवार यांनी कबूल केलं की, त्यांना रिअल इस्टेट किंवा बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान नाही, तरीदेखील त्या फर्ममधून महिन्याला कोट्यवधींचं उत्पन्न मिळतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.