Big Breaking! पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज! CM फडणवीसांनी
दिलेला शब्द पाळला, दिवाळीपूर्वी मिळणार मदत, ३१,६२८ कोटींच पॅकेज जाहीर
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली, तर काहींची घरेही पाण्याच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. "आता दिवाळी कशी साजरी करायची?" असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला होता. काही शेतकऱ्यांनी तर सर्वस्व नष्ट झाल्याने हताश होऊन आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. शेतकऱ्यांना आता सर्वाधिक अपेक्षा होती
ती सरकारकडून मदतीची. अखेर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी
मदत जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना किती मदत मिळणार?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात खरीपच्या मोसमात पाऊस पडला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. घरांचे आणि गोठ्यांचेही नुकसान झाले. प्रत्यक्ष पाहणी करून आम्ही तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये आणि गहू-तांदूळ अशी छोटी मदत दिली. याशिवाय २,२०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर सतत विचार केला जात आहे की जास्तीत जास्त मदत कशी करता येईल. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली, रब्बीची पेरणी करण्याची क्षमता नाही, तसेच शेतकऱ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाला आहे."
२५३ तालुक्यांना सरसकट मदत
"भविष्यात शेतकऱ्यांना उभे राहता यावे, म्हणून आम्ही एक पॅकेज तयार केले आहे. १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. २५३ तालुके सरसकट घेतली. त्यात आम्ही मदत जाहीर करणार आहोत. २९ जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले. घरांची पुनर्बांधणी, डोंगरी भागातील घरांना मदत, गोठ्यांना मदत, दुकानदारांना मदत तसेच दुधाळ जनावरांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत केली जाणार आहे."
खरडून गेलेली जमीन:
शेतकऱ्यांनी माती आणावी लागेल. ४७ हजार हेक्टरवर कॅश आणि ३ लाख हेक्टरवर नेरेआमार्फत मदत दिली जाणार आहे.
विहिरी:
विशेष बाब म्हणून मदत केली जाणार आहे. ३० हजारांची मदत गाळ काढण्यासाठी दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे शुल्क:
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातही माफी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी एकूण ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले गेले आहे.
कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरप्रती १८,५०० रुपये मदत देण्यात येणार आहे. हंगामी बागायती पिकांसाठी हेक्टरप्रती २७,००० रुपये तर बागायती पिकांसाठी हेक्टरप्रती ३२,५०० रुपये मदत दिली जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घर बांधून मिळेल
अंदाजे ५० लाख शेतकऱ्यांना विविध प्रकारचे नुकसान झाले असून, ६५ लाख हेक्टरवर शेतीला हानी झाली आहे. त्यापैकी ४५ लाख शेतकऱ्यांना आधीच विमा रक्कम मिळालेली असून, यापुढे १७ हजार हेक्टर शेतावर झालेल्या नुकसानीसाठी वेगळी विमा रक्कम दिली जाणार आहे. तसेच, दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. एकूण २५३ तालुक्यांना सरसकट मदतीचा लाभ मिळणार असून, ज्यांच्या घरांना नुकसान झाले आहे, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घर बांधून दिले जाईल. पूर्वी एनडीआरएफची जी मदत होती त्यामध्ये १० हजारांची वाढ केली आहे.राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. यामुळे धरणे भरली आणि मोठ्या प्रमाणावर नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. परिणामी अनेक गावे जलमय झाली, शेती पूर्णपणे नष्ट झाली. चार ते पाच दिवस शेती पाण्यात बुडाल्याने सर्व पिकांचे नुकसान झाले. विरोधकांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करत आंदोलनही केले होते. शेतकऱ्यांनी स्वतःही सरकारकडे मदतीची मागणी केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.