Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर...; अखेर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता, केंद्र सरकारचं पत्र

Big Breaking! इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर...; अखेर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता, केंद्र सरकारचं पत्र
 

सांगली: अखेर इस्लामपूरच्या ईश्वरपूर  नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. आता इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर  असा बदल होणार आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी शेवटच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली होती. इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर  असे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. आता इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.

अनेक वर्षापासून होती मागणी
मागील अनेक वर्षापासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी सुरू होती. गेल्या ४०-५० वर्षांपासून चर्चेत असलेल्या इस्लामपूरचे नाव देखील ईश्वरपूर होण्याची शासनस्तरावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे; अशी मागणी चार - पाच दशकांपूर्वी केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर 1986 मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात जाहीर सभा झाली होती. या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर असा उल्लेख प्रथमच जाहीर व्यासपीठावरून केला होता. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर अशी घोषणा केली आहे.  इस्लामपूरच्या नामांतराबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. नामांतराचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आला होता, त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता शहराचे नामांतर ईश्वरपूर होईल. त्यानंतर मग ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका, जिल्हा, अशा सर्वच शासकीय, निमशासकीय सर्व स्वरूपाच्या व्यवसाय, उद्योग, संस्था, स्तरावर ईश्वरपूर हे नाव लागेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.