Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या भव्य कार्यालयाच्या भूमिपूजनानंतर अमित शहा म्हणाले, माझ्यासाठी दोन-तीन खोल्या ठेवा


भाजपच्या भव्य कार्यालयाच्या भूमिपूजनानंतर अमित शहा म्हणाले, माझ्यासाठी दोन-तीन खोल्या ठेवा
 

मुंबई:  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आता कोणच्याही कुबड्यांवर चालत नाही, तर स्वतःच्या पायावर चालत आहे, असे भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या नव्या बहुमजली इमारतीच्या भूमिपूजनानंतर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

यावेळी त्यांनी पक्षाचा 1950 पासून 2025 पर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. जनसंघाच्या स्थापनेपासून पक्ष हा संघटनेच्या आधारावर चालवण्याचा आमचा विचार राहिला आहे. सिद्धांताच्या आधारावर आमचे धोरण ठरवले आहे. आणि भारतीय जनतेच्या हिताचा कायम विचार करत काम करत आहे. या तिन्ही उद्देशांची परीपुर्ती भाजपच्या कार्यालयात होते, असे अमित शहा म्हणाले. भाजपच्या छोट्यातील छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांसाठी पक्षाचे कार्यालय हे मंदिर असते. येथेच पक्षाचे सिद्धांत आणि धोरण ठरवले जाते. कार्यकर्त्यांची ही कार्यशाळा असते. इतर पक्षांसाठी पक्ष कार्यालय ऑफिस असू शकते, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी ते मंदिरापेक्षा कमी नसते, असे शहा म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुंबईची अध्यक्ष आणि सर्व माजी अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत अमित शहा म्हणाले की, कधीकाळी महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचा असलेला भाजप आज क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. पक्षाला आता कोणाच्याही कुबड्या घेऊन चालण्याची गरज राहिलेली नाही. भारतीय राजकारणात भाजपचे आज अमिट स्थान आहे, तिच स्थिती आता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची निर्माण झाली आहे, 
 
55 हजार स्केअर फुटांचे हे कार्यालय असणार आहे, येथे ग्रंथालय, 400 आसनांचे ऑडिटोरियम आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचेही कार्यालय आहे. भाजप प्रदेश कार्यालयाचे हे रेखाचित्र पाहून आनंद झाल्याचे सांगत अमित शहा म्हणाले की, आता याच पक्ष कार्यालयातून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडला जाईल आणि तो महाराष्ट्राचा राज्यकारभार पाहणार आहे.

अमित शहांनी कार्यालयाच्या बहुमजली आणि भव्य इमारतीचे कौतूक करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीसांना मी सांगितले आहे की, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना राहण्यासाठी तीन, चार खोल्या देखील या कार्यालयात तयार करा. जिथे कार्यकर्ते येऊन राहू शकतील. त्यांच्या या वाक्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील हसून दाद दिली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.