Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाव नव्हे तर गावचं मतदार यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा अजब कारभार

नाव नव्हे तर गावचं मतदार यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा अजब कारभार
 

मतचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रानं उठवलेलं असताना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात एक दोन नव्हे तर तब्बल 20 गावांची नावं मतदार यादीतून गायब झालीयेत..नेमका काय आहे हा घोटाळा
या गावात जवळपास अडीच हजार मतदार आहेत पण हे गावच मतदार यादीतून गायब आहे.. इथल्या गावकऱ्यांकडून जाणून घेऊया की हा नेमका काय प्रकार आहे.. याचं गावातील संरपंच शशिकांत मंगळेंना मतदार याद्यांमधील हा घोळ पहिल्यांदा लक्षात आला.. आणि त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली..


अंजनगाव सुर्जी तालुक्यातीत मतदार यादीतून कोणत्या 20 गावांची नावं गायब आहेत? पाहूयात
अंजनगाव तालुक्यातील खानमपुर पांढरी गणांमधील टाकरखेडा मोरे/ धनेगांव आणि अहमदपुर या गावाची नावं गायब आहेत... तर कापूस तळणी गणातील रौदळपुर, पोही, रत्नापुर, जवळा बुद्रुक, जवळा खुर्द, औरंगपुर , सैदापूर या गावाची नावं मतदार यादीत नाहीत... तर चौसाळा गणामधील डोंगरगाव ( तुरखेड) आणि भंडाराज गणामधील मलकापूर बुद्रुक,आडगाव खाडे, नवापूर,मासमापूर,मूर्तिजापूर घोगर्डा, हसनापूर पार्डी,शिरजगाव,कारला, निमखेड आडे , जवर्डी, धुडकी या गावची नावं ही मतदार यादीत नाहीत..
दरम्यान अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मतदार याद्यांमधील घोळ राज्यभर चर्चेत आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. लोकशाहीतून हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात विरोधकांनी केलाय.

दुसरीकडे वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या यांद्यामधील घोळ समोर आल्यानंतर ही प्रारूप मतदार यादी होती, अशी सारवासारव प्रशासकीय अधिकाऱ्यानं केलीय... दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्याने सारवासारव केली असली तरी प्रश्न उरतो.. तो म्हणजे 3 गणातील 20 गावं मतदार यादीतून वगळण्याचं कारण काय? ही तांत्रिक चूक आहे की जाणूनबुजून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव? याची उत्तर निवडणुक आयोगाला द्यावीच लागणार? त्यातच एकाच तालुक्यातील 20 गावं मतदार यादीतून गायब असतील तर संपूर्ण जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याचा विचार आता तुम्हीच करा.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.