Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पमुदतीच्या कौशल्य विकास कोर्सचा तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा:, आमदार सुधीरदादा गाडगीळ; सांगलीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट

अल्पमुदतीच्या कौशल्य विकास कोर्सचा तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा:, आमदार सुधीरदादा गाडगीळ; सांगलीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट
 

सांगली, दि.८: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तरुण-तरुणींना उत्तम औद्योगिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्याशिवाय आता शासनाने अल्पमुदतीचे कौशल्य विकास अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. त्यांचा तरुण-तरुणीने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.  सांगलीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आमदार गाडगीळ यांनी भेट दिली. तेथील सर्व कार्यशाळामध्ये सुरू असलेल्या कामकाजाची आणि दिल्या जात असलेल्या प्रशिक्षणाची त्यांनी माहिती घेतली. प्राचार्य सौ. मेघना जोशी आणि उपस्थित निदेशक व प्रशिक्षकांच्या बरोबर त्यांनी चर्चा केली. विद्यार्थ्यांबरोबरही संवाद साधला. 

आमदार गाडगीळ म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तरुण-तरुणींना उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी विविध अभ्यासक्रमांचे (कोर्सेस) उत्तम प्रशिक्षण दिले जाते. मात्र आता विद्यार्थ्यांना अधिक प्रशिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या रोजगार मिळवण्याच्या क्षमतेत वाढ व्हावी. कौशल्याचा विकास व्हावा आणि त्यांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या दृष्टीने शासनाने आता अल्पमुदतीचे काही अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आमदार गाडगीळ म्हणाले, कौशल्य विकास अभ्यासक्रमामुळे (कोर्सेस) मुला-मुलींना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
 
ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरही होऊ शकतील. तरुण-तरुणींनी शासनाच्या या अतिशय उपयुक्त आणि महत्त्वकांक्षी अशा योजनेचा लाभ घ्यावा. आमदार गाडगीळ यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील कार्यशाळांची पाहणी केली. कार्यशाळात उपलब्ध यंत्रसामग्री, उपकरणे यांचीही माहिती घेतली. प्राचार्य जोशी, तसेच गटनिदेशक एस. के. गोसावी  व्ही एस. पाटील, एम. ए.पाटील, प्रकाश पत्की, शिल्प निदेशक सुदाम पाटील, एन. ए. शिंदे,कार्यालय अधीक्षक आर.व्ही. माळी,एन. डी. पाटील यांच्याबरोबर आमदार गाडगीळ चर्चा केली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये काही यंत्रसामग्री तसेच उपकरणे यांची आणखी आवश्यकता असेल तर त्या संदर्भातील प्रस्तावही घ्यावा असेही त्यांनी सुचवले. 



सांगली: येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट दिली. प्राचार्य सौ. मेघना जोशी, प्रशिक्षण संस्थेतील निदेशक तसेच विद्यार्थी यांच्याबरोबरही संवाद साधला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.