Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर सरकारचा दरोडा, पडळकरांना पक्षातून काढा, सतेज पाटलांनी सगळचं काढलं

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर सरकारचा दरोडा, पडळकरांना पक्षातून काढा, सतेज पाटलांनी सगळचं काढलं
 

सरकारचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आधीच अतिवृष्टी आणि पूरग्रस्तामुळे बेजार झाले असताना त्यांच्या शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम सुरू आहे. हे सरकार दिवाळखोरीत जात असल्याचे हे संकेत आहे. सरकारची प्रायोरिटी ही शेतकरी नव्हे, तर बिल्डर लॉबी आहे. शेतकऱ्यांच्यावर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. ते पूरग्रस्ताना मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 15 रुपये घेण्याच्या प्रश्नांवर बोलत होते.

सरकारने चुकीचे प्रोजेक्ट थांबून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सरकारला वोट चोरीमुळे आत्मविश्वास वाढला आहे. काहीही झाले तरी आम्ही निवडणूक जिंकताच हा फाजील आत्मविश्वास त्यांना आहे. दिल्ली असो वा महाराष्ट्र सरकारचे मदत निवडणुकीच्या आधी होईल. निवडणूक लागली की मदतीची घोषणा करतील. तोपर्यंत शेतकऱ्यांचे अश्रू आटून जातील. आता तुमच्या लोकप्रिय घोषणा थांबवा, आणि मदत जाहीर करा, असा हल्लाबोल सतेज पाटील यांनी केला.

आमदार पडळकर यांच्या वक्तव्यावरून बोलताना, मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना तंबी दिले की नाही हे यावर शंका आहे. कारण ज्या पद्धतीने पडळकर यांचे वक्तव्य येत आहे. त्यावरून त्यांना तंबी दिलेली नाही, असेच काहीसे दिसत आहे. पडळकर यांचा जितका निषेध करावा तितका थोडाच असल्याचाही घणाघात सतेज पाटील यांनी केलाय. 
 
पडळकर जे बोलले त्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र राहिला आहे का? याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असेही खडेबोल सतेज पाटील यांनी सुनावले आहेत. जर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिली असेल तर त्यांनी आजच्या आज पडळकर यांना पक्षातून काढावे. पक्षाची आचारसंहिता भंग झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.

काय म्हणाले होते पडळकर?

काही दिवसांपूर्वीच पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शऱदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. पडळकर यांनी, 'जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाहीत' असे विधान केले होते. यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. यावरूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनकरून पडळकर यांच्या बाबत तक्रार केली होती. ज्यानंतर फडणवीस यांनी पडळकर यांना तंबी दिल्याचे बोलले जात होते. यानंतर ही पडळकर यांची जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जीभ घसरली. यावेळी त्यांनी, जयंत पाचलांवर पुन्हा एकदा जहाल टीका करताना, 'जयंत पाटील कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं?'ते सांगावे अशी खोचक विचारणा केली. तसेच जयंत पाटील यांचा जयंत्या असा उल्लेख देखील केला. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.