सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल आणि आता सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'राजारामबापू पाटलांनी उभे केलेल्या माणसांचे साखर कारखाने जयंत पाटलांनी हाणले, त्यांचा तळतळाट लागणार' असा खोचक टोला लगावत खोत यांनी पाटलांच्या कारखान्यांच्या व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष टीका केली.
याशिवाय, राष्ट्रवादीला ‘लुटारची आणि गुंडांची टोळी’ म्हणत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचारावर हल्ला चढवला. काल गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर घोटाळ्याचे आरोप केले असताना, आज सदाभाऊ खोत यांनी दिलीप पाटलांसह राष्ट्रवादीवर तिखट प्रहार केले. ही टीका खंडे नवमीच्या हत्यार पूजनाच्या पार्श्वभूमीवर झाली असून, खोत यांनी ‘प्रस्थापितांचे वार उध्वस्त करू’ असा इशाराही दिला.
सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनात गैरप्रकार केल्याचा आरोप केला. “राजारामबापू पाटील यांनी अनेक माणसे उभी केली, पण त्यांनी उभे केलेल्या लोकांचे साखर कारखाने जयंत पाटलांनी हाणले. संभाजी पवार यांचा कारखाना हाणला, तुम्हाला त्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा खोत यांनी दिला.ही टीका सांगलीतील सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक संकट आणि व्यवस्थापनातील समस्या लक्षात घेता महत्त्वाची ठरते. खोत यांनी हे सांगताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा बघा घेतला नाही, असा आरोपही केला. याशिवाय, इस्लामपूरमधील कृषी महाविद्यालय आणण्याचा प्रयत्न केला असताना, तो रद्द करण्याचा डाव पाटलांनी आखला, असाही आरोप खोत यांनी केला.
दिलीप पाटलांवर वैयक्तिक हल्ला
खोत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री दिलीप पाटलांवर वैयक्तिक पातळीवर तीव्र टीका केली. “महाराष्ट्र संस्कृतीमध्ये मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या. तेव्हा माझ्या बापाने १२ नांगराचा काळ काढला होता,” असं सांगत खोत यांनी पाटलांच्या आधीच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा उल्लेख केला. माढा विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाकडून लढलेल्या खोत यांना पाच लाख मते मिळाली, तर ‘तुम्ही कधी जिल्हा परिषदेला उभा राहिलात का?’ असा सवाल करत त्यांनी पाटलांच्या राजकीय अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.