Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चार दिवसांच्या बाळाला मारण्यासाठी दगडांखाली दाबलं; शिक्षक आई वडिलांचे हादरवणारे कृत्य, धक्कादायक कारण

चार दिवसांच्या बाळाला मारण्यासाठी दगडांखाली दाबलं; शिक्षक आई वडिलांचे हादरवणारे कृत्य, धक्कादायक कारण
 

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून अतिशय लाजिरवाणा घटना समोर आली आहे. पेशाने शिक्षक असलेल्या एका बापाने त्याच्या चार दिवसांच्या मुलाला जंगलात दगडांखाली दाबून मरण्यासाठी सोडून दिलं होतं. सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. मुलाचे रडणे ऐकून गावकऱ्यांनी त्याला वाचवले. सध्या, मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तो सुरक्षित आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलाच्या आई बापाला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत जन्मदात्याने मुलाला संपवण्यासाठीचे धक्कादायक कारण सांगितलं जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

चौथ्या मुलाला जन्म दिल्यानंतर नोकरी जाण्याच्या भीतीने शिक्षकाने हे भयानक पाऊल उचललं होतं. या मुलाला मारून त्या शिक्षकाला तीनच अपत्ये असल्याचे दाखवायचं होतं नाहीतर त्याच्या नोकरीला धोका होता. त्यामुळे मुलाच्या आई वडिलांनी त्याला संपवण्यासाठी हादरवणारं कृत्य केलं. आरोपींनी चार दिवसांच्या मुलाला जंगलात दगडांखाली दाबून ठेवलं होतं. मात्र त्याच्या नशिबात दुसरेच काही होतं. नवजात बाळाने रात्रभर मुंग्या चावा आणि थंडी सहन केली. सकाळी, जेव्हा गावकऱ्यांनी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्यांनी त्याला वाचवले. 
 
बाळाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल आहे आणि ते आता सुरक्षित आहे. पोलिसांनी आरोपी पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडील बबलू दंडोलिया आणि आई राजकुमारी दंडोलिया हे दोघेही नंदनवाडी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांना आधीच तीन मुले आहेत. त्यांना भीती होती की चौथे मूल झाल्याने सरकारी नियमांनुसार त्यांची नोकरी जाऊ शकते. या कारणामुळे आधी दंडोलियाने पत्नी गर्भवती असल्याचे लपवून ठेवलं. २३ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता घरी बाळाचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी २७ सप्टेंबर रोजी त्यांनी नंदनवाडी गावातील जंगलात नवजात बाळाला सोडून दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी, जेव्हा गावकरी जंगलात गेले तेव्हा त्यांनी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांनी दगड बाजूला काढून मुलाला जिवंत आढळले. पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीच्या थंडीमुळे आणि मुंग्या चावल्यामुळे मुलाला संसर्ग होण्याचा धोका असल्याचे डॉक्टरांनी ठरवले. प्राथमिक उपचारानंतर, त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.