महाविद्यालयात सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राहुल मानसिंग चव्हाण (रा. बोरगाव) यास १० वर्षांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावण्यात आला. घटना २०२० मधील: २२ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन अत्याचार केला; पीडिता गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
न्यायालयाचा निर्णय: जिल्हा सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी शिक्षा सुनावली; दंडाची १६ हजारांची रक्कम पीडितेस देण्याचा आदेश दिला. महाविद्यालयात सोडण्याच्या बहाण्याने तरुणीस जबदरस्तीने दुचाकीवर बसवून तिला जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून बोरगावच्या तरुणास १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी राहुल मानसिंग चव्हाण (वय २४, रा. झरोना मळा, बोरगाव, ता. तासगाव) असे त्याचे नाव आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून आरती देशपांडे - साटविलकर यांनी काम पाहिले.
खटल्याची हकीकत अशी, पीडिता २२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ७.४५ च्या सुमारास महाविद्यालयात जाण्यासाठी बस थांब्यावर उभी होती. त्यावेळी तेथे तिला परिचित असणारा आरोपी राहुल चव्हाण तेथे आला. त्याने तिला महाविद्यालात सोडतो असे सांगून जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. यानंतर राहुल हा पीडितेस घेऊन तासगाव येथे आला. तेथे मित्रांच्या मदतीने तिला चारचाकीमध्ये बसण्यास भाग पाडून होणाई मंदिर, हातनूरकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला असणाऱ्या जंगलात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. परिणामी, पीडितेने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.दरम्यान, १६ जून २०२० रोजी पीडितेची तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले.न्यायमूर्तींनी आरोपी राहुल चव्हाण यास दोषी ठरवून त्यास सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची सर्व रक्कम १६ हजार रुपये पीडितेस देण्याचा आदेश न्यायमूर्तीनी दिला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. आर. साळोखे यांनी केला. तपासकामात पोलिस अंमलदार रवींद्र माळकर, पैरवी कक्षातील सुनीता कांबळे, रेखा खोत, वंदना मिसाळ यांनी मदत केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.