Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! अजित दादांचा राजीनामा? 'पार्थचे' प्रताप येणार अंगलट..! पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी 'या' नेत्याकडून राजीनाम्याची मागणी

Big Breaking! अजित दादांचा राजीनामा? 'पार्थचे' प्रताप येणार अंगलट..! पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी 'या' नेत्याकडून राजीनाम्याची मागणी


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या वादग्रस्त व्यवहारप्रकरणी पुणे येथील तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नेमण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी महसूलमंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


‘बनवाबनवी’ आणि व्यवहार रद्द करण्याची मागणी
एकनाथ खडसे यांनी पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीने 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याच्या व्यवहारात ‘मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी’ झाल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राज्य सरकारने हा व्यवहार तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
व्यवहार रद्द करण्याची कारणे सांगताना खडसे म्हणाले..

“ही जमीन ‘महार वतनाची’ असल्यामुळे तिची खरेदी करण्यासाठी महसूल आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे, जी या प्रकरणात घेतलेली दिसत नाही. या मूळ कारणावरून हा व्यवहार रद्द होऊ शकतो.” स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी जी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत, ती बनावट असल्याचा त्यांनी आरोप केला. केवळ एक लाख रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीने 300 कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली आणि 300 कोटी रुपये कोठून आले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

न्यायाधीशामार्फत चौकशीची मागणी
खडसे यांनी अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधत, हे प्रकरण उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाशी संबंधित असल्याने सरकारी चौकशी समितीकडून निष्पक्ष सत्य बाहेर येईल अशी शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे, या प्रकरणातील ‘गौडबंगाल’ बाहेर काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे. जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी खडसे यांनी मागणी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.