Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नाच्या आमिषाने संबंध, गुण जुळेनात म्हणत नकार दिल्याचा आरोप; सुप्रीम कोर्ट म्हणाले, कुंडली बघून नातं जोडलं पाहिजे

लग्नाच्या आमिषाने संबंध, गुण जुळेनात म्हणत नकार दिल्याचा आरोप; सुप्रीम कोर्ट म्हणाले, कुंडली बघून नातं जोडलं पाहिजे


बलात्कार प्रकरणातील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महिलेला कुंडली पाहून नातं जोडण्याचा सल्ला दिला. महिलेनं आरोप केला होता की आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून संबंध ठेवले, पण नंतर कुंडली जुळत नसल्याचं कारण सांगत लग्नाला नकार दिला. या प्रकरणात आरोपी पोलीस अधीक्षक आहे तर पीडित महिला पोलीस उपअधीक्षक आहे. दोघेही २०१४मध्ये एकाच जिल्ह्यात कार्यरत होते. त्यावेळी पीडित महिलेचं वय ४० तर आरोपीचं वय ३३ वर्षे इतकं होतं.

न्यायमूर्ती केवी विश्वनाथन आणि जेबी पारदीवाला यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. पटना हायकोर्टानं २०२४मध्ये हा खटला रद्द केला होता. यानंतर पीडित महिलेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने विचारलं की, एफआयआर कोणत्या आधारावर केली तर महिलेच्या वकिलानं सांगितलं की, लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले होते.
न्यायमूर्तींनी पुन्हा प्रश्न केला की, तुम्ही त्यांनी वचन दिल्यानं नातं जोडलंत का? हे तुमचं प्रकरण आहे का? वकिलांनी म्हटलं की, आरोपीकडून प्रपोज करण्यात आलं होतं पण नंतर लग्नाला नकार दिला. नकाराचं कारण विचारलं असता वकिलांनी सांगितलं की, दोघांच्या कुंडल्या जुळत नव्हत्या. यावर न्यायमूर्ती पारदीवाला म्हणाले की, ज्योतिषाचा सल्ला उशीरा घेतला असं वाटतं. 

न्यायमूर्ती म्हणाले की, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जर कुंडली जुळत नसेल तर तुम्ही चांगलं आयुष्य कसं घालवणार? अशा परिस्थितीत नात्याची सुरुवात करण्यासाठी तुम्ही कुंडली जुळवून बघायला पाहिजे. तुम्ही फक्त लग्नावेळीच ज्योतिषाकडे गेलात.
पीडित महिलेनं सर्वोच्च न्यायालयात आरोप केला की माझ्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला गेला होता. यावर न्यायमूर्ती म्हणाले की, कोण विश्वास ठेवेल, तुम्ही डीसीपी आहात. न्यायमूर्तींच्या प्रश्नावर बोलताना वकिलांनी सांगितलं की, आरोपी मोठा अधिकारी असल्यानं सतत दबाव टाकला. मेसेजच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करत होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.