Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ! आता बँकेत न जाताच घरबसल्या मिळणार लाइफ सर्टिफिकेट सेवा! जाणून घ्या कशी?

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ! आता बँकेत न जाताच घरबसल्या मिळणार लाइफ सर्टिफिकेट सेवा! जाणून घ्या कशी?


भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था  यांनी एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे आता निवृत्त पेंशनधारक नागरिकांना "डिजिटल लाइफ सर्टिफिकेट"  घरबसल्या सादर करता येणार आहे. हे प्रमाणपत्र Employees' Pension Scheme, 1995 अंतर्गत पेन्शनधारकांसाठी आवश्यक असते.


घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट सेवा

या उपक्रमामुळे आता पेंशनधारकांना बँकेत किंवा EPFO कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. पोस्टमन किंवा ग्रामीण टपाल सेवक थेट त्यांच्या घरी जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करून देतील. ही सेवा विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण आता त्यांना लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी प्रवास करण्याची किंवा रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही.

सेवा पूर्णपणे मोफत
या उपक्रमाची विशेषतः म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. EPFO या सेवेसाठी लागणारा संपूर्ण खर्च उचलणार आहे. त्यामुळे पेंशनधारकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. भारतीय पोस्टचे देशभरात 1.65 लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसेस आणि 3 लाखांपेक्षा जास्त पोस्टल कर्मचारी आहेत. हे कर्मचारी डोअरस्टेप बँकिंग डिव्हाइस वापरून पेंशनधारकांचे फिंगरप्रिंट किंवा फेस ऑथेंटिकेशन करून घरबसल्या सर्टिफिकेट तयार करून देतील.

जीवन प्रमाण  प्रमाणपत्र म्हणजे काय?

भारतीय पोस्ट पेमेंट्स बँकेने 2020 मध्ये डोअरस्टेप डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सेवा सुरू केली होती. यामध्ये 'जीवन प्रमाण' हे डिजिटल प्रमाणपत्र आधार बायोमेट्रिक पडताळणीद्वारे तयार केले जाते, जे पेंशनधारक जिवंत असल्याची पुरावा देते.

जीवन प्रमाण प्रमाणपत्र कसे काढावे ?
यासाठी पेंशनधारक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन किंवा स्थानिक पोस्टमन अथवा ग्रामीण डाक सेवकाला संपर्क करून ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकतात. त्यासाठी फक्त आपला आधार क्रमांक आणि पेन्शनची माहिती द्यावी लागते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पेंशनधारकाला SMS द्वारे पुष्टीकरण संदेश मिळतो. दुसऱ्या दिवशी हे प्रमाणपत्र 'जीवन प्रमाण' वेबसाइटवर ऑनलाइन पाहण्यासाठी उपलब्ध होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.