सत्याचा मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. शेलार यांनी नेतृत्वाच्या विरोधात बोलण्याचं धाडस केलंय. त्यांच्यावर अन्याय झाल्यानं ते बोलतायत. शेलार यांनी फडणवीस यांना पप्पू ठरवलं असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दुबार मतदारांची यादी दाखवली. यात मविआने फक्त हिंदू-दलित मतदारांची नावं घेतली पण मुस्लिम दुबार मतदार त्यांना दिसले नाही का असा प्रश्न शेलार यांनी विचारला होता. शेलार यांनी दिलेले पुरावे आम्ही कोर्टात देऊ असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलंय.
मतदारांना नोंदणीस खास केंद्र उभारतोय. तुम्ही तुमची स्वत:ची नावं वगळली का पाहा. लिंग, धर्म बदललाय का तेदेखील पाहा असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान आशिष शेलार यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. त्यांचं अभिनंदन त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे मान्य केलं. त्यांनी दिलेले पुरावे आम्ही कोर्टात देऊ. शेलार यांनी खरं बोलायचं धाडस दाखवलं ते धाडसी आहेत अशी उपाहासात्मक टीका उद्धव ठाकरेंनी केली.भाजपमध्ये एक तरी हिंमतवाला आहे. नेतृत्वाच्या विरोधात कुणीतरी बोलतंय. शेलार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाच पप्पू ठरवलंय. मोदी आणि फडणवीस यांना शेलार यांनी खोटं ठरवलंय. शेलार यांनीही पुरावे दिलेत. शेलारांनी एखाच दगडात अनेक पक्षी मारलेत. मतदारयाद्यांमध्ये घोळ आहे हे आता भाजपने मान्य केलं असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेलार आमच्यासोबत या असंही म्हटलं.उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सत्याचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात काढला होता. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर, मतचोरी याविरोधात आम्ही आवाज उठवला. पण आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं मालक का देतायत?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.