Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हा पत्रकार नाही...', निवडणूक आयोगाच्या PC मध्ये एकच गोंधळ, नंतर उघड झाला त्याचा राजकीय पक्ष, म्हणाला 'मला त्यांनीच...'

'हा पत्रकार नाही...', निवडणूक आयोगाच्या PC मध्ये एकच गोंधळ, नंतर उघड झाला त्याचा राजकीय पक्ष, म्हणाला 'मला त्यांनीच...'


राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार आहे. या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना दुबार मतदारांसंबधी प्रश्न विचारुन भांबावून सोडलं. यादरम्यान आयुक्तही गोंधळलेले दिसले. दरम्यान यादरम्यान एका व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर गोंधळ उडाला.

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी दुबार मतदारांवरुन प्रश्न विचारण्यात सुरुवात केली. आयुक्त या प्रश्नांवर उत्तरं देत असतानाच एका व्यक्तीने प्रश्न विचारला. ही व्यक्ती अचानक निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना प्रश्न विचारु लागल्याने सर्वजण थांबले. मात्र त्यावेळी ही व्यक्ती पत्रकार नाही सांगत इतर पत्रकारांनी आक्षेप घेतला. तुम्ही पत्रकार नसल्याने प्रश्न विचारु शकत नाही असं सांगत आक्षेप घेण्यात आला. यानंतर त्यांना थांबवण्यात आलं. नंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.

ही व्यक्ती नेमकी कोण?
पत्रकार परिषदेत गोंधळ निर्माण करणाऱ्या या व्यक्तीचं नाव राजेश त्रिपाठी आहे. उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या वतीने या व्यक्तीने प्रश्न विचारला होता. पत्रकारांनी हा पत्रकार नसल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर
छाननी - 18 नोव्हेंबर
माघार घेण्याची मुदत - 21 नोव्हेंबर
मतदान - 2 डिसेंबर
मतमोजणी - 3 डिसेंबर
शासन अधिकृत निकाल - 10 डिसेंबर

आचारसंहिता लागू
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता जरी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू असली तरी काही निर्णय, कार्यक्रम जर येथील मतदारांवर प्रभाव करणारे असतील तर तेदेखील आचारसंहितेमध्ये येईल असं सांगण्यात आलं आहे.

विभागनिहाय नगरपरिषद - नगरपंचायत निवडणुका
कोकण - 27
नाशिक - 49
पुणे - 60
छत्रपती संभाजीनगर - 52
अमरावती - 45
नागपूर - 55

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.