गोवा :- नाईट क्लबमध्ये मृत्यूचा तांडव, 23 जणांनी गमावला जीव; मध्यरात्री नेमकं काय घडलं? पंतप्रधान मोदींनी घेतली दखल
शनिवारी रात्री गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. या आगीत तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुख: व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, गोव्यातील अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो आहे. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्याने नाईट क्लबमध्ये आग लागली. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकाने रात्रभर बचावकार्य राबवत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार 23 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 20 जण पुरुष तर तीन महिला होता. मृत्यू झालेल्यांमध्ये काही पर्यटक होते. तर, बाकी नाईट क्लबच्या तळघरात काम करणारे कर्मचारी होते. भाजप आमदार मायकल लोबो म्हणाले, ही घटना धक्कादायक आहे. गोव्यातील सर्व क्लबचे सुरक्षा ऑडिट झाले पाहिजे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.