Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार सांगली दौऱ्यावर; अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे करणार लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार सांगली दौऱ्यावर; अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे करणार लोकार्पण


सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सांगली दौऱ्यावर येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानानंतर फडणवीसांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.सोमवार, दि १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस हे सांगली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.12 डिसेंबर) आमदार सुधीर गाडगीळ यांनी अहिल्यादेवी होळकर चौक परिसराची पाहणी केली.

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ९ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उंची २१ फूट असून वजन सुमारे ४ टन आहे. देशातील अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 
पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या अनुषंगाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे सांगलीमध्ये प्रशासन जोरदार तयारीला लागले आहे. पुतळ्याच्या परिसरातील सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता इत्यादी कामे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे या सर्व कामांचा आढावा आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ सर्व नागरिकांनी अनावरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी नगरसेविका रोहिणी पाटील मनोज सरगर, विष्णू माने, संतोष पाटील, मनगु आबा सरगर, अतुल माने, भोपाल सरगर, अमित देसाई दरिबा बंडगर, सुरज पवार आदी पदाधिकारी, मनपा अधिकारी, विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळामध्ये आवाज उठवला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून 'पॅकेज' हा तीन अक्षरी जादुई शब्द वारंवार समोर आणला जातो; मात्र वास्तवात तो किती उपयोगाचा, याचा थांगपत्ता नसल्याची तीव्र खंत आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केली. "शेतकऱ्यांची परिस्थिती आज अत्यंत दयनीय आहे. पॅकेजच्या नावाखाली त्यांची गळचेपी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांना जाहीर झालेले पॅकेज ही केवळ दाखवणूक आहे का, हे तपासण्याची वेळ आली आहे. भरपाई पूरक नाही, आणि शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे अजूनही दिसत नाही." अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.