स्थानिक गुन्हे अन्वेषण' ची तीन वर्षांतील दमदार कामगिरी सतीश शिंदे : १४८० गुन्ह्यांचा छडा; ७७ कोटींचा मुद्देमाल
सांगली :- मी गुन्हे अन्वेषण विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या तीन वर्षांत पथकाने १ हजार ४८० गुन्ह्यांचा छडा लावत पंधराशे गुन्हेगारांना गजाआड करता आले. ७७कोटींचा मुद्देमाल जप्त केला. खून, दरोडे, घरफोड्यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. नशामुक्त सांगली अभियानासाठी आमच्या विभागाने अत्यंत प्रभावी कामगिरी केली. त्यावर मी समधानी आहे, अशा भावना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केल्या.
श्री. शिंदे यांची बदली झाली असून, शुक्रवारी (ता. ५) ते पदभार सोडणार आहेत. त्याआधी त्यांनी गेल्या तीन वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कामगिरीचा आढावा माध्यमांसमोर मांडला. श्री. शिंदे म्हणाले, 'ऑगस्ट २०२२ मध्ये पदभार स्वीकारला. त्यानंतर माझ्या पथकाच्या माध्यमातून खुनासहित दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात काम केलेत्यात तिघांना अटक केली. तसेच ३५ खुनातील आरोपींना जेरबंद करण्यात आले. जबरी चोरीचे ६० गुन्हे उघडकीस आणून ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरोड्याचे ९ गुन्हे उघडकीस आणले. त्यात ७ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. विशेषतः रिलायन्स ज्वेल्स दरोड्यात माझ्या पथकाने यशस्वी कारवाई केली. यातील मुख्य संशयितांसह इतरांना बिहारमधून अटक करण्यात आली होती.गावठी पिस्तूल, कोयता, तलवारी बाळगणारे व तस्करी करणाऱ्या ७२ जणांना गजाआड करण्यात आले. या तीन वर्षांत १ हजार ४८० गुन्ह्यांचा छडा लवण्यात यश आले. त्यातील १ हजार ४५२ गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ७६ कोटी ९७ लाख ७७हजार ८४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यातील तुंगातील खून अत्यंत क्लिष्ट होता. आंध्र प्रदेशमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीला शिताफीने गजाआड केले. कुख्यात गुंड म्हमद्या नदाफलाही कोल्हापूर जिल्ह्यातून जेरबंद केले. तीन वर्षात प्रभावी कामगिरी करण्याचे समाधान वाटते आहे.'
एमडी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त
सतीश शिंदे म्हणाले, 'नशेखोरीविरोधात व्यापक मोहीम एलसीबीने हाती घेतली. त्या माध्यमातून विट्यातील एमडी ड्रग्ज कारखान्यावर छापा टकला. तसेच गांजा, नशेच्या गोळ्या, ई-सिगारेटसह तब्बल तीस कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या कामगिरीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमच्या पथकाचे कौतुक केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.