Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- खून प्रकरणातून वाद पेटला; मिरजेत दोन गटांची एकमेकांच्या घरांवर दगडफेक

सांगली :- खून प्रकरणातून वाद पेटला; मिरजेत दोन गटांची एकमेकांच्या घरांवर दगडफेक


मिरज : मिरजेतील निखिल कलगुटगी खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कलगुटगी कुटुंबातील दोन गटात पुन्हा एकदा तणाव निर्माण होऊन रविवारी रात्री शिवीगाळ, दमदाटी व एकमेकांच्या घरावर दगडफेकीची घटना घडली. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटाच्या ११ महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निखिल कलगुटगी खूनप्रकरणी चैतन्य कलगुटगीसह १५ जणांना अटक झाली होती. त्यानंतर या दोन नातेवाईक व शेजारी असलेल्या कुटुंबांत सुरू असलेली धुसफूस रविवारी उफाळून आली. दोन्ही बाजूंच्या महिलांमध्ये जोरदार भांडण, शिवीगाळ व घरावर दगड, विटा फेकण्यात आल्या.

याबाबत योगिता विश्वास कलगुटगी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पद्मा सुरेश कलगुटगी, पूजा लखन कलगुटगी, अक्षता चैतन्य कलगुटगी व तनुजा राजू कलगुटगी (सर्व रा. मिरज) यांनी शिवीगाळ करून रस्त्यावर पडलेले दगड, विटा त्यांच्या घरावर फेकले.
जमाव जमवून दगडफेक केल्याची तक्रार

अक्षता चैतन्य कलगुटगी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिता विश्वास कलगुटगी, योगिता विश्वास कलगुटगी, प्रियांका सागर यमगर, निशा नीलेश पाथरुट, शोभा यमगर व दोन अनोळखी महिलांनी बेकायदा जमाव जमवून दुपारी झालेल्या वादाच्या रागातून घरावर दगडफेक केली आहे. परस्परविरोधी तक्रारींवरून मिरज शहर पोलिसांनी ११ महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.