सांगली जिल्ह्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. बहिणीच्या लग्नाच्या कारणावरुन जिल्ह्यातील जगदाळे आणि कोळी या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये ६ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोनही कुटुंबीयांनी सांगली ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोघांच्याही फिर्यादीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पद्माळे येथील जगदाळे आणि कोळी या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश कोळी याने संशयित दिगंबर जगदाळे यांची चुलत बहिण शिवानी सुनील जगदाळे हिच्याशी लग्न केले होते. याचा राग दिगंबरला होता. पुतण्या सागर कोळी याच्या घरासमोर संशयित दुचाकीवरुन आले. दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी घरात घुसून घरातील सदस्यांना मारहाण केली. तसेच फिर्यादी रुपाली तसेच त्यांची जाऊ रेखा आणि सुवर्णा यांना त्यांच्या घरासमोर येवून दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.