नागपूर : नागपूरसह देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास केल्यास आता विशिष्ट किलोमिटरनंतर अनेक भागात पथ कर नाके (टोल नाके) लागतात. येथे कराची रक्कम भरल्याशिवाय चारचाकी वा जड वाहन पुढे नेता येत नाही. या पथकराबाबत मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत केली आहे. समाज माध्यमावर फिरणाऱ्या एका 'व्हिडोओ'मध्ये नितीन गडकरी काय म्हणाले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
सध्याच्या प्रचलीत पद्धतीनुसार राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनाने प्रवास करतांना एखादा टोल नाका लागल्यास वाहन धारकाला वाहन तेथे थांबवावे लागले. येथे टोल नाक्यावरील कर्मचारी विशिष्ट कॅमेराच्या मदतीने अथवा स्कॅनरद्वारा संबंधिताच्या वाहनातील फास्ट टॅग स्कॅन करतात. त्यानंतर टोल नाक्याचा कर त्याच्या खात्यातून कपात केला जातो. त्यानंतर हे वाहन पुढे नेता येते. परंतु या पद्धतीत मोठा बदल करण्याची घोषणा नितीन गडकरीचा समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या संसदेतील व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. त्यात नितीन गडकरी म्हणाले, आता देशभरातील टोल नाके बंद होणार आहे.नवीन पद्धतीत सदर वाहने महामार्गाने जात असतांना त्याच्या वाहन क्रमांक पाटीचे छायाचित्र काढले जाईल. त्यानंतर हे वाहन निश्चित ठिकाणी गेल्यावर वाहन धारकाच्या खात्यातून टोलची रक्कम कपात केली जाईल. या पद्धतीत आता रस्त्यावर पथ नाके व तेथे कर्मचारी असा प्रकार दिसणार नाही. सध्या सुमारे १० ठिकाणी हे काम दिले गेले आहे. येत्या वर्षभरात सगळ्याच ठिकाणी ही नवीन पद्धत सुरू होणार असल्याचेही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे नवीन पद्धतीनुसार टोल वाहन चालकांच्या थेट खात्यातून कसे कपात होईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
देशात १० लाख कोटींची कामे सुरू
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे देशभरात ४ हजार ५०० प्रकल्पांवर काम सुरू आहे. हे सगळे प्रकल्प सुमारे १० लाख कोटी रुपयांचे असल्याचेही नितीन गडकरी यांचे समाज माध्यमावर प्रसारित व्हिडिओमध्ये दिसत आहे.
टोलद्वारे मिळणाऱ्या महसूलात वाढ
गेल्या काही काळात टोलद्वारे मिळणाऱ्या महसूलात वाढ झाली आहे. २०२३- २४ मध्ये भारतातील एकूण टोल वसुली ६४ हजार ८०९ कोटी ८६ लाख रुपयांवर पोहोचली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढली आहे. तर २०१९- २० मध्ये २७ हजार ५०३ कोटी रुपये महसूल जमा झाला. आता त्यात कमालीची वाढ झाल्याची माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.