अनेक महिला संतुष्टीसाठी कुत्र्यासोबत झोपतात., भाजप आमदाराचे लज्जास्पद विधान; देशभरातून संताप, कारवाईची मागणी
पाटणा : बिहारच्या मोतिहारी येथील भाजप आमदार प्रमोद कुमार यांनी महिलांबद्दल केलेले धक्कादायक आणि अश्लील वक्तव्य समोर आल्यानंतर प्रचंड संताप उसळला आहे. पाटणा येथे माध्यमांनी खासदार रेणुका चौधरी यांच्या पाळीव कुत्र्यासह संसदेत प्रवेशाच्या घटनेवर प्रतिक्रिया विचारली असता, प्रमोद कुमार यांनी महिलांविषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य केले.
आमदार म्हणाले की, "अनेक महिला संतुष्टीसाठी कुत्र्यासोबत झोपतात. मोबाईलवर पाहिलेत तर तुम्हाला हे सगळे दिसेल." हे विधान सार्वजनिकपणे समोर येताच सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून आमदारांवर तत्काळ कारवाईची मागणी होत आहे.
आरजेडी प्रवक्त्या प्रियंका भारती यांनी व्हिडिओ शेअर करून प्रश्न केला की, "मोदीजींना संतुष्टी तेव्हा मिळते का, जेव्हा त्यांच्या पक्षातील नेते महिलांबद्दल अभद्र टिप्पणी करतात?" अनेक युजर्सनीही अशाच प्रकारे भाजपवर निशाणा साधला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी पाळीव कुत्र्यासह संसद परिसरात पोहोचल्या होत्या. भाजप नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.प्रतिक्रिया देताना रेणुका चौधरी म्हणाल्या,"हा लहान आणि नुकसान न करणारा प्राणी आहे. चावणारे आणि डसणारे संसदेत बसले आहेत, कुत्रे नाहीत."भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. काँग्रेस प्रवक्ते डॉ. स्नेहाशीष वर्धन म्हणाले की, "भाजप आमदारांचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या महिलांविषयीच्या मानसिकतेचे दर्शन घडवते. त्यांनी सार्वजनिक माफी मागावी." आरजेडीचे एजाज अहमदही म्हणाले की, "महिलांचा अपमान करणारे हे वक्तव्य असून भाजपच्या महिला नेत्या गप्प का आहेत?"
सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप विचारल्यावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी म्हणाल्या,"कोणता प्रोटोकॉल? कोणता कायदा? रस्त्यावर स्कूटर आणि कारची धडक झाली. त्या गोंधळात हे छोटे पिल्लू रस्त्यावर इकडे तिकडे फिरत होते. चाकाखाली जाईल म्हणून मी ते उचलून गाडीत ठेवले आणि संसदेत गेले. नंतर ते परत पाठवले. मग इतका गदारोळ कशासाठी?" त्या पुढे म्हणाल्या, "देशात खरोखर डसणारे आणि चावणारे संसदेत बसून सरकार चालवतात. एका मुक्या प्राण्याची काळजी घेतल्याचा इतका मोठा विषय बनवला जात आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.