''होय, मी हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव हसीन हाजी मस्तान मिर्झा आणि माझ्यावर अतोनात अत्याचार झाले आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी असा कडक कायदा करावा की माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळू शकेल''
सोशल मीडियावर असा एक व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि जिने हा व्हिडियो बनवलायं तिने स्वत:ला हाजी मस्तानची मुलगी असल्याचा दावा केला आहे. या व्हिडियोच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय की, ही महिला नक्की कोण आहे? ती स्वतःला हाजी मस्तान आणि सोना यांची मुलगी का म्हणते? आणि तिने आयुष्यभर कोणत्या संघर्षांना तोंड दिले आहे?
मुंबई आणि अंडरवर्ल्ड हे खूप जुनं समीकरण आहे. मुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण एका नावाने मुंबई अंडरवर्ल्डला एक नवी ओळख दिली आणि ग्लॅमरला अंडरवर्ल्डसोबत जोडले. ते नाव आहे माफिया हाजी अली मस्तान. मस्तानला मुंबईचा पहिला डॉन देखील म्हटले जाते. तर याच डॉन हाजी मस्तानची आपण मुलगी असल्याचा दावा हसीन मस्तानने केला आहे.
1984 साली जन्मलेल्या हसीन मस्तानने काही बॉलिवूड चित्रपटातदेखील काम केलं होतं. देव डी, दाल मे कुछ काला है या हिंदी चित्रपटांसह तिने साऊथ इंडस्ट्रीमध्येही छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या, पण अभिनयापेक्षा हसीना तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.
हाजी मस्तानच्या मुलीने पंतप्रधान मोदींना काय विनंती केली?
2016 मध्ये हसीन मस्तानने मुंबईमध्ये एक तक्रार दाखल केली, ज्यात तिने अनेक धक्कादायक आरोप केले होते. आपल्या तक्रारीत तिने म्हटले होते की, वयाच्या 12 व्या वर्षीच माझं जबरदस्तीने लग्न लावलं आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले. हे अथ्याचार इतके भयानक होते की लहान वयातच मला गर्भपात करावा लागला.याच संबंधित एक व्हिडियो हसीनने आता सोशल मीडियावर टाकला आहे. ती म्हणते गेल्या कैक वर्षांपासून माझी लढाई सुरू आहे, माझ्या सारख्या अनेक भगिनींना अशा शोषणाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांनी मी विनंती करते की, त्यांनी या देशासाठी असा एक कडक कायदा बनवावा जेणेकरून माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळू शकेल.या शिवाय हसीनने एक मोठा गौप्यस्फोट केला. ती म्हणते, “माझ्या आईनेच म्हणजे ‘सोना’ हिनेच माझी खरी ओळख जगापासून लपवून ठेवली. सोना ही हाजी मस्तानची दुसरी पत्नी आणि हाजी मस्तान-सोना यांची मुलगी म्हणजे हसीन.
हाजी मस्तानच्या विश्वासू साथीदारानेच माझे शोषण केले - हसीन मस्तान
हाजी मस्तानचं निधन झालं तेव्हा हसीन 12 वर्षांची होती. अंडरवर्ल्डच्या दुनियेत तोपर्यंत हाजी मस्तानचा दबदबा बऱ्यापैकी कमी झाला होता आणि त्याची जागा अंडरवर्ल्डचा दुसरा डॉन दाऊदने घेतली होती. हाजी मस्तानचा मृत्यू झाल्यानंतर गँगची सुत्रं त्याचा विश्वासू साथीदार नासिर हुसेन शेखने आपल्या हाती घेतली. नासिर हुसेनने आपल्या हाती फक्त हाजी मस्तानचं साम्राज्य नाही घेतलं तर त्याने हाजी मस्तानच्या या दुसऱ्या पत्नीवरही डोळा ठेवला. त्याने सोनासोबत जबरदस्तीने अनैतिक संबंध ठवले असा आरोप करताना हसीन पुढे म्हणते की, या नासिरने आईसोबत माझेही लैंगिक शोषण केले. त्याचे अगोदर लग्न झाले असतानाही जबरदस्तीने त्याने माझ्याशी लग्न केले, मला मारहाण केली. माझ्या वडिलांची संपत्ती लुटली आणि त्याला जेव्हा मी विरोध केला तेव्हा मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. जूहूमध्ये हाजी मस्तान यांनी माझ्या नावावर एक बंगला ठेवला होता, तोदेखील या नासिरने बळकावला, अजूनही न्यायालयात त्यासबंधी खटला सुरू असल्याचा दावा हसीन करते.
डॉन हाजी मस्तान आणि मधुबालाची अधुरी कहाणी…
हसीन मस्तानने आपल्या आईचा म्हणजे सोनाचा जो उल्लेख केलाय त्याची तर एक वेगळीच कहाणी आहे… 60 ते 80 च्या दशकात हाजी मस्तानच्या नावाची भीती संपूर्ण शहरात पसरली होती, बॉलीवूड देखील या नावाकडे दुर्लक्ष करत नव्हते. त्या काळातील या सर्वात मोठ्या अंडरवर्ल्ड डॉनची प्रत्येक शैली अतिशय फिल्मी होती. या डॉनच्या आयुष्यात बॉलिवूडचे दोन चेहरे असे होते की त्यांनी आपली छाप कायमची सोडली. संपूर्ण शहर ज्या नावला घाबरत होतं त्या व्यक्तीचा जीव मात्र एका अभिनेत्रीमध्ये अडकला होता.
एकीकडे मस्तानच्या अंडरवर्ल्डच्या जगात हाजी मस्तानचा बोलबाला होता. पठाण टोळीचा करीम लाला आणि दक्षिणेतील टोळीचा मुख्या वरदराजन यांच्याशी त्याने हातमिळवणी केली होती. समुद्राच्या लाटांच्या उंचीप्रमाणे त्याचे तस्करीचे काम सर्व उंचीच्या मर्यादांना स्पर्श करत होते.दुसरीकडे डॉनच्या मनात प्रख्यात अभिनेत्री मधुबालाबद्दलचे प्रेम वाढत होते. हाजी मस्तान त्या वेळेची वाट पाहत होता जेव्हा तो आपल्या मनातील गोष्ट तिच्याशी करु शकेल. पण ती योग्य वेळ कधीच आली नाही. मधुबाला कधीच मस्तानची झाली नाही. मुंबईचा सर्वात मोठा डॉन, ज्याच्या सांगण्यावर संपूर्ण बॉलीवूड काम करायचे तो एका अभिनेत्रीला आपली बनवू शकला नाही.
साठच्या दशकात हाजी मस्तान हे मुंबईतील एक मोठे नाव होते, त्याला हवे ते मिळत असे. मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणे, आलिशान घरात राहणे, बॉलीवूडच्या सर्व पार्ट्यांमध्ये हजेरी लावणारा डॉन एक दिवस मधुबालाला आपली प्रेयसी बनवेल असे वाटत होते. पण मधुबालावर मनापासून प्रेम असूनही हाजी मस्तानने त्याला याबद्दल कधीच सांगितले नाही. हाजी मस्तानने ती गोष्ट मनात ठेवली. कारण होते मधुबालाचे लग्न आणि तिचा आजार. मधुबालाने किशोर कुमारसोबत स्थिरावली होती. यादरम्यान मधुबालाची प्रकृतीही खूप खालावू लागली. सुमारे नऊ वर्षे ती या आजारी राहिली आणि नंतर एके दिवशी तिचा मृत्यू झाला.
मधुबाला सारखी दिसायची सोना, म्हणून मग…?
मधुबालाच्या निधनाने डॉनचे एकतर्फी प्रेमही अधुरे राहिले. मधुबालानंतर बॉलिवूड वर्तुळात हाजी मस्तानचा रस काहीसा कमी झाला होता, पण त्यानंतर चित्रपटांमध्ये एका नव्या नावाच्या चर्चेने डॉनचे लक्ष वेधून घेतले. सोना नावाच्या एका नव्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. सोना अगदी मधुबालासारखीच दिसायची. मधुबालासारख्या दिसण्यामुळे सोनाची बॉलिवूडमध्ये चर्चा होऊ लागली. दोघीमध्ये एवढं साम्य कसं असू शकत असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
सोनाच्या चर्चा सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. ही गोष्ट डॉनच्या कानावर पडल्यावर त्यानेही सोनाला भेटण्याचा निर्णय घेतला. सोनाला पाहताच हाजी मस्तानने ठरवले की जर त्याला मधुबाला मिळू शकली नाही, तर तो सोनाला आपली करण्याचा प्रयत्न करेल. हाजी मस्तानने तात्काळ सोनाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सोनासोबत लग्नाचा प्रस्ताव पाठवला. सोनाचे खरे नाव शाहजहान बेगम होते. या स्थळानंतर सोनाच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला आणि नंतर दोघांनी लग्न झाले. हाजी मस्तान आणि सोना यांना एक मुलगी ही झाली, तिच ही हसीन हाजी मस्तान… मुंबईतील गुन्हेगारी विश्वासंबंधीच्या बहुचर्चित 'डोंगरी टू दुबई' या पुस्तकाचे लेखक एस. हुसैन झैदी म्हणतात, "मस्तान तरुणपणी मधुबालाचे चाहते होते आणि तिच्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती. पण मधुबालाचं लवकर निधन झालं, आणि तसंही ती जिवंत असती तरी मस्तानला तिच्याशी कधीच लग्न करता आलं नसतं."
"त्या काळी मुंबईत मधुबालासारखी दिसणारी एक अभिनेत्री काम करत होती. तिचं नाव होतं वीणा शर्मा उर्फ सोना. मस्तानने तिच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तिने तो तत्काळ स्वीकारला. मस्तानने सोनासाठी जुहूमध्ये एक घर विकत घेतलं आणि तिथे तिच्या सोबत राहू लागला." हळूहळू मुंबईतील 'व्हीआयपी' लोकांच्या वर्तुळात मस्तानचं स्थान स्थिरस्थावर होऊ लागलं आणि त्याचा तस्करीचा कालखंड लोक विसरू लागले. हाजी मस्तानला पहिल्या पत्नीपासून तीन मुली होत्या आणि नंतर त्याने सुंदर शेखर नावाच्या एका मुलाला दत्तक घेतलं.
डॉनचा मृत्यू सोना आणि हसीनसाठी साठी कठीण
काही काळ सोनाचे मस्तानसोबत आनंदी जीवन होते. पण 1994 मध्ये डॉनची हत्या झाली होत्याचे नव्हते झाले त्यानंतर डॉनच्या मृत्यूनंतर सोनाचा त्रास सुरू झाला. मस्तानने सोनासोबत दुसरं लग्न केलं होतं आणि त्यामुळे डॉनच्या घरच्यांना सोनाचा तिरस्कार होता. हाजी मस्तानच्या मृत्यूनंतर सोना पूर्णपणे एकटी पडली. हाजी मस्तानच्या कुटुंबीयांनी आणि नासिर हुसेनने सोनाला खूप त्रास दिला, हाजी मस्तानची सर्व संपत्ती तिच्याकडून काढून घेण्यात आली, असं म्हटलं जातं. मस्तानच्या मृत्यूनंतर तिला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागले.
कोण होता हाजी मस्तान?
तमिळनाडूच्या कुड्डलोर येथे 26 मार्ज 1926 रोजी हाजी मस्तान मिर्झाचा जन्म झाला होता. त्याचे वडील हैदर मिर्झा एक गरीब शेतकरी होते. त्यांची आर्थिक परिस्थितीत खूपच बिकट होती. अनेकवेळा घरामध्ये खाण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते. घर चालवणे फार जिकरीचे झाले होते. अशा हलाकिच्या परिस्थीतीमुळे हैदर मिर्झाची शहरात जाण्याची इच्छा होती. पण परिस्थीतीमुळे घर सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती.घरच्या परिस्थिती इतकी हलाकीची झाली की दोन दिवस घरामध्ये अन्नाचा कण शिजला नव्हता. अखेर या परिस्थीतीला वैतागून हैदर मिर्झाने बाहेर जाऊन पैसे कमविण्याचा निश्चय केला आणि 1934 मध्ये ते आपल्या मुलाला सोबत घेऊन मुंबई गाठली. येथे त्यांनी अनेक कामे केली पण त्यात यश मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी क्रॉफर्ड मार्केटमध्ये सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले. बराच काळ लोटूनही दुकानातून विशेष काही कमाई होत नव्हती. दरम्यान दुकानावर रिकामा बसलेला मस्तान रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या मोठमोठ्या गाड्या आणि आलिशान इमारतींकडे पाहत असे. येथून त्याला आपल्याकडे पण गाड्या आणि बंगले असावे असे स्वप्न रंगवले होते.
कुलीच्या कामापासून केली सुरुवात
मिर्झा परिवाराला मुंबईत येऊन 10 वर्ष झाले होते. पण परिस्थीती मात्र बदल झाला नव्हता. याचदरम्यान मुंबईच्या गालिब शेख सोबत मस्तानची ओळख झाली. गालिबला देखील एका चतुर मुलाची आवश्यकता होती. त्याने मस्तानला सांगितले की, तो जर डॉकवर कुलीचे काम केले तर तो त्याच्या कपडे आणि पिशवीमध्ये काही विशेष सामान लपवून आरामात बाहेर आणू शकतो. या मोबदल्यात त्याला पैसे देखील मिळतील. यानंतर मस्तानने 1944 मध्ये डॉकवर कुली म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो तेथे मनलावून काम करत होता. कामादरम्यान मस्तानने डॉकवर काम करणाऱ्या लोकांसोबत मैत्री करण्यास सुरुवात केली.
गुन्हेगारी विश्वातील पहिले पाऊल
चाळीसच्या दशकात लोक विदेशातून इलेक्ट्रॉनिक सामान, महागडी घड्याळे, सोने, चांदी किंवा दागिने घेऊन येत होते. त्यांना या सामानावर कराच्या रूपात मोठी रक्कम द्यावी लागत होती. यामुळे डॉकवर तस्करी करणे फायद्याचे होते. गालिबची ही गोष्ट मस्तीनच्या लक्षात आली होती. मस्तानने आपल्या हातून ही संधी सोडली नाही आणि त्याने गुपचुपपणे तस्करांची मदत करण्यास सुरुवात केली. कुली असल्यामुळे त्याच्यावर कोणाला संशय येत नव्हता. या कामासाठी मस्तानला चांगली किंमत मिळत होती.
डॉकवर काम करताना मस्तानचे आयुष्य सुधारण्यास सुरुवात झाली होती. तस्करांची मदत केल्यामुळे त्याला चांगलाच फायदा होत होता. 1950 दशक मस्तान मिर्झासाठी एक मैलाचा दगड ठरले होते. 1956 मध्ये दमन आणि गुजरातचा कुख्यात तस्कर सुकुर नारायण बखिया आणि मस्तानच्या संपर्कात आला. दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघांनी सोबत काम करण्यास सुरुवात केली. त्याकाळी सोन्याची बिस्कीटे, फिलिप्सचे ट्रांझिस्टर आणि ब्रँडेड घड्याळींची खूप मागणी होती. पण टॅक्समुळे अशाप्रकारचे सामान भारतात आणणे परवडण्यासारखे नव्हते. त्यानंतर दोघांनी दुबई आणि येडन येथून सामानाची तस्करी करू लागले. या तस्करीमधून दोघांनाही चांगला नफा मिळत होता. हळूहळू दोघांचे काम वाढत गेले आणि आता मस्तानचे आयुष्य पहिल्यापेक्षा फार बदलले होते. एक साधारण कुलीचे काम करणारा मस्तान आता बाहुबली माफिया मस्तान भाई बनला होता.
सुरुवातीला मुंबई अंडरवर्ल्डमध्ये वरदराजन मुदलियार ऊर्फ वर्धा याची दहशत होती. पण त्याला माफिया डॉनची प्रतिमा निर्माण करता आली नाही. काही काळानंतर तो चेन्नईला माघारी फिरला. तो गेल्यानंतर मुंबई अंडरवर्ल्डमध्ये फक्त मस्तान भाई म्हणजेच हाजी मस्तान हे नाव होते. 1970 चे दशक येईपर्यंत मस्तानने मुंबईवर आपली वेगळी जागा निर्माण केली होती. मस्तानने फक्त दहा वर्षात मुंबईमध्ये आपले वर्चस्व स्थापन केले होते. मुंबईच्या समुद्रावर फक्त मस्तानचेच शासन चालत होते. मस्तानचे जे स्वप्न पाहिले होते, त्यापेक्षा कितीतरी मोठी झेप त्याने घेतली होती. तो आता श्रीमंत आणि सामर्थ्यवान बनला होता. त्याला पांढऱ्या रंगाचा सूट परिधान करण्याचा आणि मर्सिडीज गाडीतून फिरण्याचा खूप धंद होता.
पोलिसही झुकवायचे डोके
हाजी मस्तानने मुंबईमध्ये आपले वर्चस्व असे प्रस्थापित केले की, पोलिस आणि कायद्याला तो झुगारत नव्हता. पोलिसांनी त्याला 1974 मध्ये अटक केली असता, त्याच्यासाठी व्हीआयपी सारखी सुविधा दिली होती. त्याला तुरूंगात न टाकता एका बंगल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आले होते. पोलिस त्याला सलाम करत होते. कारण मस्तान देखील पोलिसांची मदत करत होता. त्यांना महागड्या भेटवस्तू देणे त्याची सवय होती. पण जर एखादा अधिकारी त्याचे म्हणणे ऐकत नसेल तर तो त्याची बदली करत होता.
इंदिरा गांधींनी पाठविले तुरूंगात
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मस्तानविषयी माहिती मिळत होती. मस्तानच्या वाढत्या प्रभावाचा इंदिरा गांधींना त्रास होत होता. इंदिरा गांधीच्या आदेशावरून पोलिसांनी मस्तान मिर्झाला अटक करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. पण आणीबाणीच्या लागू केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तुरूंगात जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. 18 महिने तो तुरूंगात राहिला होता. येथून त्याच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळणार होती. तेथे त्याची आणि जेपी यांची भेट झाली. जेपीच्या संपर्कात आल्यानंतर मस्तानवर त्याचा विशेष प्रभाव पडला. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर मस्तानचे हेतू बदलले होते. त्याने गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकण्याचा निश्चय केला.
इंदिरा गांधींना ऑफर केली मोठी रक्कम
आणीबाणीत तुरूंगात गेल्यानंतर काही दिवसातच हाजी मस्तानने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या सुटकेसाठी मोठी रक्कम देण्याची ऑफर केली होती. पण इंदिराजींनी ही ऑफर लाथाडून लावली. आणीबाणीनंतर जनता पार्टी सत्ता आल्यानंतर मस्तानसह जवळपास 40 कुख्यात तस्करांना सोडून देण्यात आले. कारण मस्तानने आणीबाणी लागू होण्यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांना पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मदत केली होती. यामुळे जनता पार्टी सरकारने मस्तानची मदत केली होती.
राजकारणात ठेवले पाऊल
अखेर मस्तानने 1980 मध्ये गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकला आणि राजकारणाकडे आपले मन वळविले. 1984 मध्ये महाराष्ट्राचे दलित नेते जोगिन्दर कावडे यांच्यासोबत मिळून दलित-मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षाची सुरुवात केली. 1990 मध्ये पार्टीचे भारतीय अल्पसंख्यक महासंघ असे नामकरण करण्यात आले. बॉलीवूड सुपरस्टाप दिलीप कुमार यांनी या राजकीय पक्षाचा भरपूर प्रचार केला. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती दर्शविली होती. पक्षाला राजकारणात यश मिळाले नसले तरी निवडणुकीमध्ये काळ्यापैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे सांगितले जाते. येथूनच निवडणुकीमध्ये मोठ्याप्रमाणीत पैसा वापरण्याच्या प्रथेला सुरुवात झाली.
न चालविली गोळी, न घेतला कोणाचा जीव
हाजी मस्तान मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वांत मोठा ताकदवर डॉन होता. पण या डॉनने आपल्या संपुर्ण आयुष्यात कोणाचाही जीव घेतला नाही. त्याने कोणावरही हल्ला केला नाही. एकवढेच नाही तर त्याने एक सु्द्धा चालविली नाही. असे असूनही मस्तान या गुन्हेगारी विश्वातील मोठे नाव होते. त्याकाळी त्याचा नाव फक्त मुंबईतच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात होते. मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉनने आयुष्यभर मुंबईच्या लोकांची मदत करत होता. आपल्या जीवनाचा शेवटचा काळ त्याने आपली पत्नी आणि दत्तक घेतलेल्या मुलासोबत व्यतित केला. हाजी मस्तानचा 1994 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबईत आजही त्याच्या नावाचे किस्से ऐकायला मिळतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.