खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय स्टेट बँकेत नोकरी अन् ४४ लाखांचं पॅकेज, ९९६ पदांसाठी भरती, आजच अर्ज करा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत सध्या स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ९०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. स्टेट बँकेत चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. त्यांनी sbi.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
पात्रता
स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती होणार आहे. वीपी हेल्थ पदासाठी उमेदवारांना ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत ६ वर्षांचा अनुभव असायला हवा. एवीपी वेल्थ पदासाठी ग्रॅज्युएशन आणि मॅनेजर पदावर ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असावे. वीपी हेल्थ पदासाठी ५०६ रिक्त पदे आहेत. या पदासाठी ४४.७० लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. एवीपी हेल्थ पदासाठी ३०.२० लाख रुपये पगार मिळणार आहे. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी ६.२० लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. एकूण ९९६ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी sbi.bank.in वर जा.यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. यासाठी पासवर्ड टाका.यानंतर विंडो रिओपन करुन फॉर्म भरा. यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती भरा.यानंतर फोटो आणि सही अपलोड करतात. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे.यानंतर अर्ज सबमिट करुन प्रिंट आउट काढून घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.