Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

CJI सूर्यकांत यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!

CJI सूर्यकांत यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!


सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (३ डिसेंबर) मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर मोठा राडा झाला. न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्यासह असलेल्या या खंडपीठापुढे एका खटल्याची सुनावणी सुरू असताना अचानक एक महिला वकील बिनदाखल्याची खंडपीठासमोर उभी राहिली आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या हत्येचा विषय काढला.

महिलेने काय सांगितलं?
तिने सांगितले की, ती मुंबईत असताना दिल्लीतील एका गेस्ट हाऊसमध्ये तिच्या मैत्रिणीची हत्या झाली. तिने अग्निशमन दलाला मृतदेह पाहायला सांगितले होते आणि आता स्वतःलाही जीवाची भीती वाटत असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. मुंबई पोलिस आयुक्तांना भेटण्याची आणि प्रकरणाचा तपास योग्यरित्या व्हावा अशी मागणी तिने केली. विशेष म्हणजे, सुरुवातीला एफआयआर नोंदवण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यालाच आता तपास अधिकारी नेमल्याचा आरोप तिने केला. 

हे ऐकून मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शांतपणे "पुढील केस, कृपया" असे म्हणत दुसऱ्या प्रकरणाकडे वळण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला वकील कोर्टरूम सोडण्यास तयार नव्हती. खंडपीठाने तिला मदत करण्यासाठी दुसऱ्या वकिलाची व्यवस्था करून दिली, पण तिला तेही मान्य नव्हते. अखेर मुख्य न्यायमूर्तींनी वरिष्ठ वकील मल्होत्रा यांना तिची समजूत काढण्यास सांगितले.

कोर्ट मार्शल बोलावावे लागले

वरिष्ठ वकील मल्होत्रा यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावरच ती ओरडली आणि "माझ्याशी असे बोलू नका, तुम्ही कदाचित वकीलही असाल" असे उद्गार काढले. यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि खंडपीठाला कोर्ट मार्शल बोलावावे लागले. मार्शल आल्यानंतर तिने गार्डलाही "असभ्य वागणे थांबवा" असे सुनावले.

मायक्रोफोन लगेच बंद
कोर्टरूममधील गोंधळ एवढा वाढला की मायक्रोफोन लगेच बंद करावा लागला. शेवटी खंडपीठाने तिला योग्य कायदेशीर मदत मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर आणि महिला न्यायालयीन अधिकारी तसेच वरिष्ठ वकिलांच्या मदतीने तिला शांत करून कोर्टरूममधून बाहेर काढण्यात यश आले. ही संपूर्ण घटना सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठात घडली, ज्यामुळे न्यायालयाची कार्यवाही काही काळ खोळंबली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.