सुमारे लाखभर पगार घेणाऱ्या एका शिक्षकाने शाळेत न जाता एका महिलेला सात हजार रुपये पगारावर शिकवण्यासाठी नेमले आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.
हा धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद शाळेत समोर आला आहे. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार मेतकुटे यांनी सगळा प्रकार समोर आणला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजकुमार मेतकुटे यांनी थेट शाळेत जाऊन संबंधित महिलेला विचारले असता गेल्या चार महिन्यापासून एका शिक्षकाच्या जागेवर सात हजार रूपये पगारावर शिकवण्याचे काम करत असल्याची तिने कबुली दिली आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या ही बोगस दाखवली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारात घोटाळा झाल्याची संशय ही आता व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.