Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत गावभागात भीषण मारहाण; दोघेजण गंभीर जखमी

सांगलीत गावभागात भीषण मारहाण; दोघेजण गंभीर जखमी


सांगली -गावभाग परिसरात झालेल्या हाणामारीत दोघेजण गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सांगली शहर पोलीसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.

यामध्ये चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

नागेश अनिल नवले (वय ३२, रा. रामनगर, साई मंदिरानजीक, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार १५ रोजी रात्री ११ च्या सुमारास फिर्यादी नागेश हा त्याचा मित्र विजय जाधव यास घरी सोडण्यासाठी गेला होता. तो परत येत असताना गावभागात संशयित संग्राम मोरे याने नागेश यास अडविले आणि विजय यास घरी का सोडले? असा जाब विचारला. यावरुन वादीवादीतून संशयित संग्राम सह प्रदिप कोकरे, अमोल टिपुगडे (सर्व रा. गावभाग सांगली) यांनी नागेश यास दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्याचप्रमाणे नागेश यांच्यादुचाकीची तोडफोड केली. दरम्यान प्रदिप हिंदुराव कोकरे (वय ३६, रा. हरिपूर, पाटणे प्लॉट, माने गॅरेजच्या मागे, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री ११ च्या सुमारास फिर्यादी प्रदिप हे त्यांचे मित्र संग्राम मोरे असे दोघेजण अमोल अशोक टिपुगडे यास त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित नागेश नवले याने त्यास वाटेत अडविले. तू काय टग्या लागून गेलास का? असे विचारुन त्याच्याशीवाद घातला. नवले याच्याजवळ असणाऱ्या कटरने संग्राम मोरेवर वार केला. मात्र तो वार संग्रामने चुकविला.

यावेळी प्रदिप आणि अमोल हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता संशयित नागेश याने अमोल याच्या छातीवर तर प्रदिप यांच्या मांडीवर कटरने वार करुन जखमी केले. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील फिर्यादी नोंदवून घेवून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.