Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! अखेर भाजप आणि ठाकरेंचं जमलं! बोलणी यशस्वी- फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला मोठा धक्का, महाराष्ट्रात राजकीय भूकंप

Breaking News! अखेर भाजप आणि ठाकरेंचं जमलं! बोलणी यशस्वी- फॉर्म्युला ठरला, काँग्रेसला मोठा धक्का, महाराष्ट्रात राजकीय भूकंप
 

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. ६६ सदस्यसंख्या असणाऱ्या या महापालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसनं स्वबळावर २७ जागा जिंकल्या होत्या. त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या तीन नगरसेवकांचा देखील पाठिंबा होता. अशात इथं काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या चार नगरसेवकांची गरज होती. पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे.

चंद्रपूर महापालिका काँग्रेसच्या हातून निसटली आहे. इथं शिवसेना ठाकरे गट (६) आणि वंचित (२) किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. या दोन पक्षांनी एकत्र येत गटाची स्थापना केली होती. जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी थेट भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. पण काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे ठाकरे गटाशी बोलणी योग्य प्रकारे झाली नाही.
यानंतर आता ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे गट भाजपला जोरदार विरोध करत असला तर चंद्रपुरात दोन्ही पक्ष एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षाला सव्वा सव्वा वर्षे महापौर पद मिळणार असल्याची माहिती आहे. तसेच स्थायी समितीचं अध्यक्षपद शिवसेना ठाकरे गटाकडे राहिल, या दोन अटींवर हे दोन्ही पक्ष एकत्र आल्या आहेत. परिणामी सर्वाधिक जागा जिंकलेला काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडला आहे. 
हा फॉर्म्युला सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा समोर ठेवला होता. आपण कॉम्प्रमाइज नाही केलं तर सत्तेबाहेर जाईल हे लक्षात आल्यानंतर पहिलं सव्वा वर्षपद हे भाजपकडे नंतरचं उबाठाकडे जाईल. राज्यातली ही एकमेव महानगरपालिका आहे जिथे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली आहे.
 
चंद्रपुरातील घडामोडींवर अंबादास दानवे काय म्हणाले?
अंबादास दानवे म्हणाले की, अद्याप याबाबत कोणतीही माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. मी माहिती घेऊन कळवतो. तो स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे त्यामुळे त्यांनी माझ्यापर्यंत बोलण्याचा प्रश्न येत नव्हता. मात्र त्यांचं वरिष्ठांशी बोलणं झालं असेल. पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय झाला असेल असंही यावेळी आंबादास दानवे म्हणाले.

चंद्रपूर महानगरपालिका निकाल २०२६ (एकूण जागा: ६६)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)२७
भारतीय जनता पक्ष (BJP)२३
शिवसेना (UBT)०६
शेतकरी कामगार पक्ष (PWP)०३
वंचित बहुजन आघाडी (VBA)०२
अपक्ष (Independents)०२
(MIM, BSP, SHS-शिंदे)प्रत्येकी १



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.