महाराष्ट्राच्या तरुणाईला आपल्या तालावर नाचवणारी नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. आपल्या नृत्यकौशल्यामुळे गौतमी आज तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनली आहे. सध्या तरुण वर्गामध्ये गौतमी पाटील या नावाची प्रचंड क्रेझ आहे. तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
'सबसे कातिल, गौतमी पाटील' अशी ओळख असलेली गौतमी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर गौतमीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर गौतमी तिचे अनेक फोटो, तसेच लावणीचे व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिच्या एका नव्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
गौतमी पाटील अन् ओंकार राऊतचं ठरलं?
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गौतमीच्या हातात हिरवा चुडा दिसत आहे. तर तिच्या डोक्याला मुंडावळ्यासुद्धा बांधल्या आहेत. तसंच व्हिडीओमध्ये आजूबाजूला पाहुण्यांचा गोतावळासुद्धा दिसत आहे. त्यामुळे गौतमीनं अचानक लग्न केलं की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. इतकंच नव्हे; तर या व्हिडीओत तिचा नवरासुद्धा पाहायला मिळत आहे आणि नवऱ्याच्या भूमिकेत आहे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता ओंकार राऊत.
ओंकारसाठी गौतमीनं घेतला खास उखाणा
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये गौतमी ओंकारसाठी खास उखाणासुद्धा घेतला आहे. ती लाजत ओंकारसाठी "ना वायफाय… ना इंटरनेट… गच्चीवर झाली आमची पहिली भेट; ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट", हा खास उखाणादेखील घेते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.गेले काही दिवस गौतमीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. याबद्दल तिनं काही मुलाखतीत प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे गौतमीनं गुपचुप लग्न केलं की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण गौतमीनं लग्न वगैरे केलेलं नाही. हा व्हिडीओ तिनं तिच्या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी केला आहे. गौतमी आजवर विविध गाण्यांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. अशातच तिच्या एका नव्या गाण्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि हे गाणं म्हणजे 'गच्ची'. गेले काही दिवस सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा सुरू आहे. ओंकारबरोबरचं तिचं हे नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून गाण्याच्या प्रमोशनसाठी तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच व्हिडीओखाली गौतमीनं "शूटिंग आहे" अशी कमेंटदेखील केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.