पहिलाच सिनेमा हिट मग इंडस्ट्रीतून गायब; आता रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये साकारणार जिजाऊंची भूमिका; कोण आहे ही अभिनेत्री?
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने लोकप्रिय बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या बहुचर्चित 'राजा शिवाजी' या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित केला. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण
झालंय. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी,
तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 'राजा शिवाजी'
चित्रपटात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर एक
बॉलिवूड अभिनेत्री राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणारा आहे. कोण आहे ही
अभिनेत्री?
'राजा शिवाजी' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यात 'मैने प्यार किया' फेम लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन जिजामातेच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वराज्याच्या राजाला जन्म देणारी राजमाता जिजाऊ ही भूमिका चित्रपटात महत्वाची ठरणार आहे. आणि ती जबाबदारी आता भाग्यश्री यांच्याकडे आहे. या भूमिकेसाठी विचारणा होताच कसलाही विचार न करता होकार दिल्याचं भाग्यश्रीने सांगितलं. याबद्दल मुंबई टाइम्सशी बोलताना भाग्यश्री म्हणाली, 'रितेशने जेव्हा मला ही कथा आणि जिजामातांच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले, तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. जिजामाता म्हणजे अशा स्त्रीची प्रतिमा आहे, जी स्वतः तर शक्तिशाली आहेच, पण इतरांनाही सशक्त करण्याची ताकद तिच्यात आहे.' ती पुढे म्हणाली, 'शक्ती म्हणजे केवळ तलवार उचलून लढणे नव्हे, तर एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला घडवणे, हे खरे सामर्थ्य असते".
'राजा शिवाजी' यातील भूमिकेसाठीही मी एकदिलानं काम करत आहे.'
भाग्यश्री ही सांगलीच्या राजघराण्याची कन्या आहे. तिचा जन्म मुंबईत माधवराव
आणि राज्यलक्ष्मी यांच्या घरी झाला. भाग्यश्रीचे वडील विजयसिंहराव माधवराव
पटवर्धन यांना आजही 'सांगलीचे राजा' म्हणून मान दिला जातो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.