Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मैत्रिणीनं केला घात, खोटं सांगून घरी नेलं अन् भावाच्या हवाली केलं; १० वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

मैत्रिणीनं केला घात, खोटं सांगून घरी नेलं अन् भावाच्या हवाली केलं; १० वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
 

उत्तर प्रदेशात मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने जवळच्या मैत्रिणीवर स्वतःच्या भावाकडून शारीरिक अत्याचार करवून घेतले. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोळी पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या शाळेत वार्षिक समारंभ होता. त्यानिमित्त ती शाळेत गेली असता तिच्या मैत्रिणीने खोटा बनाव रचून पीडित मुलीला आपल्या घरी घेऊन गेली. त्यानंतर पीडितेला नशेच्या गोळ्या देऊन तिला बेशुद्ध करण्यात आले. याचा फायदा घेऊन मुलीच्या मैत्रिणीच्या भावाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती तिच्या घरी होती. तिने तिच्या वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या वडिलांनी म्हटले की, ती जेव्हा घरी आली तेव्हा ती नशेत होती. तिच्या एका मित्राने तिला घरी आणून सोडलं. घरी आल्यानंतर तिची मनस्थिती ठीक नसल्याने आम्ही तिची विचारपूस केली. तेव्हा तिने घडलेली घटना सांगितली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.