अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्रास दिल्याचा खळबळजनक दावा रूपाली ठोंबरे यांनी केला. पुण्यात साम टीव्हीशी बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप करत गंभीर इशारा दिला.
कुठेतरी असं वाटतं की दादा सत्य बोलून गेले की राजकारण वंगाळ झालं आहे. दादांना सुद्धा अनेक लोकांनी त्रास दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादीमधून अजित दादांना त्रास दिला. याबाबत अजितदादा यंनी अनेक लोकांशी बोलले आहेत. जे कोण नेते आहेत, आता तरी सुधारा, दादांच्या बोलण्यावरून संयम ठेवला गेला होता आता संयम राहणार नाही, असा थेट इशारा ठोंबरे यांनी दिला.
संयम पाळतोय म्हणून...
अजितदादांच्या निधनाला आज २१ दिवस होऊन गेले. संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न विचारतोय की पुरावे समोर कधी येणार? आम्ही संयम धरला होता, समाजातील वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. पण सत्य समोर येणार नसेल तर संयम सुटला जाऊ शकतो. संयम सोडायला लावू नका, आम्ही... औलादी नाहीत, अशी आक्रमक भूमिका रूपाली ठोंबरे यांनी आज व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास करण्यासाठी आमची सुद्धा एक टीम तयार केली आहे. आमच्याकडून सुद्धा पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रूपाली ठोंबरे यांनी दिली. अजितदादांच्या चौकशीसाठी जे प्रश्न समोर आणतील ते सगळे आम्ही घेणार आहोत. पक्षातले नेते बोलत नसतील कारण ते धक्क्यातून सावरले नसतील. सुनेत्रा वाहिनी, पार्थदादा यांना सावरायला अजून वेळ लागेल. झिरवळ, हिंदूराव, वैशाली नागवडे, अमोल मिटकरी आणि मी आम्ही सगळ्यांनी तपास करायला सुरुवात केली आहे. तपासाच्या भागात अनेक निवृत्त एजन्सी अधिकारी आहेत, काही एक्सपर्ट आहेत, काही निवृत्त न्यायाधीश असणार आहेत. पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी समोर येणे गरजेचे आहे, असे रूपाली ठोंबरेंनी सांगितले. जर मी राष्ट्रवादी सोडली तर मला दादा माफ करणार नाहीत, आता साथ सुनेत्रा वाहिनी यांना पाठिंबा देण्याची गरज आहे आणि तिचं अजित दादांना श्रद्धांजली असेल, असेही रूपाली ठोंबरे म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.