Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

४८ तास काम अन् ३ दिवस भरपगारी सुट्टी; कामगार संहितेत बदल; राज्य सरकारचा मोठा निर्णय

४८ तास काम अन् ३ दिवस भरपगारी सुट्टी; कामगार संहितेत बदल; राज्य सरकारचा मोठा निर्णय
 

राज्य सरकार लवकरच नवीन कामगार संहिता लागू करणार आहे. यामध्ये कामगारांना ४८ तास काम करायचे आहे आणि पुढचे दिवस त्यांना भरपगारी सुट्टी मिळणार आहे. कामागारांनी ३-४ दिवसात ४८ तास काम करायचे आहे. त्यानंतर पुढचे तीन दिवस सुट्टी घ्यायची आहे. कामाचे हे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरणार आहे. इंग्लंड, फ्रान्स, जपान यांसारख्या देशातील 'आठवड्यात ४८ तास काम करा आणि सुट्टी घ्या' ही पद्धत लागू करण्याच्या तयारीत आहे.केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांमध्ये बदल करुन कामगार विभाग ही संहिता लागू करणार आहे.

आठवड्यात ४८ तास काम आणि ३ दिवस सुट्टी
देशात दिवसाला आठ दिवस आणि आठवड्याला ४८ तास काम करण्याची मर्यादा आहे. रोज १२ तास काम करण्याची मर्यादा करण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. त्याला कामगार संघटनांनी विरोध केला आहे. आठवड्यात कामाचे ४८ तास करुन केंद्र सरकारच्या नवीन संहितेत सुधारणा करण्याचे सरकारने ठरवले आहे. तसेच कामगार विभागाने वेतन संहितेत सुधारणा केली आहे. कामगारांना ठरलेले वेतन मालकाने न दिल्यास ५० हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. नवीन नियमानुसार, महिलांना रात्रपाळीत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था मालकाला करावी लागणार आहे. सणासुदीला खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यात जास्त वेळ कामगारांना काम करावे लागते त्यांना दुप्पट बोनस देणे बंधनकारक ठरणार आहे. 
राज्यात नवीन कामगार संहिता लागू होणार

गेल्या वर्षी केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द केले आहेत. फक्त ४ कायद्यांमध्ये नवीन संहिता असणार आहे. ही कामगार संहिता तशीच राज्यांना लागू करता येणार नाही. या नवीन संहितेत काही सुधारणा करुन लागू केली जाणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.